अभिनेत्री रोजलीन खान सध्या कर्करोगाशी झुंज देत आहे. रोजलीन पेटासाठी फोटोशूट करून प्रसिद्ध झाली होती. रोजलीन खानने नोव्हेंबर महिन्यात इन्स्टाग्रामवर पोस्ट करत कर्करोग झाल्याची माहिती दिली होती. तिच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. सध्या तिची केमोथेरपी सुरू आहे, तिच्यावर पुढील ७ महिने केमोथेरपी केली जाणार आहे. दरम्यान, आता रोजलीनने तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत ती खूप कॉन्फिडंट दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अलीकडेच तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये तिचा ‘बाल्ड लूक’ पाहायला मिळतोय. व्हिडीओत तिने लाल रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केलाय आणि ती फोटोशूट करत आहे. व्हिडीओत तिचा आत्मविश्वास पाहण्यासारखा आहे. महिला केस नीट सेट नसतील, तरी फोटो काढायला धजावत नाहीत, अशात रोजलीनने केलेलं फोटोशूट लक्ष वेधून घेत आहे.

Bigg Boss 16: रितेश देशमुखने मराठमोळ्या शिव ठाकरेचं केलं कौतुक; स्पर्धकांच्या मते ‘हा’ ठरणार विजेता

व्हिडीओ शेअर करताना तिने लिहिलं की, “डोक्यावर केस असो वा नसो, मला मी सुंदर आहे. आपण सर्वजण केसांशिवायच जन्मतो. माझे केस मला परिभाषित करत नाहीत. जेव्हा तुमच्याकडे असा आत्मविश्वास असतो तेव्हा केसांची गरज असतेच कोणाला. त्यामुळे महिलांनो तुमच्या अॅटिट्यूडमध्ये जीवनाचा आनंद घ्या. केमो मला माझं जीवन जगण्यापासून रोखू शकत नाही.”

दरम्यान रोजलीनने ‘धमा चौकडी’, ‘सविता भाभी’, ‘जी लेने दो एक पल’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलंय. याशिवाय ती पेटासाठी मॉडेलिंग करते. ती तिचे आयटम नंबर्स आणि बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत असते. तसेच ती स्तनाच्या कर्करोगाबद्दल जनजागृती करते.