उर्फी जावेद सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. उर्फी नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. ज्यामुळे तिला अनेकदा ट्रोलही व्हावं लागतं. पण ती या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देताना मागे पुढे पाहत नाही. तिचा हा सडेतोड स्वभाव आणि बोल्ड अंदाज यासाठी उर्फी चांगलीच लोकप्रिय आहे.
नुकतंच एका मुलाखतीमध्ये दिलेल्या वक्तव्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगबद्दल उर्फीने वक्तव्य केलं आहे ज्यामुळे तिची खूप आलोचना होत आहे. तिने स्वतःची तुलना रणवीर सिंगशी केली आहे. मध्यंतरी ‘कॉफी विथ करण’च्या मंचावर रणवीरनेही उर्फीच्या फॅशन सेन्सची प्रशंसा केली होती. यानंतर उर्फीने रणवीरसमोर चक्क दुसऱ्या लग्नाचा प्रस्तावही ठेवला होता.
आणखी वाचा : “तुझ्यासारखे बेरोजगार…” नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगवर अभिषेक बच्चनचे भन्नाट उत्तर
आता रणवीरबद्दल बोलताना उर्फी म्हणाली की, “मला वाटतं की मी फिमेल रणवीर सिंग आहे, आणि तो मेल उर्फी जावेद आहे.” उर्फीच्या वक्तव्यामुळे तिला पुन्हा ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. उर्फी आणि रणवीर दोघांच्याही फॅशन सेन्सबद्दल नेटकरी व्यक्त होत आहेत. आपण परिधान करतो त्या कपड्यांबद्दलही उर्फीने भाष्य केलं आहे. “मला आता अशा कपड्यांची सवय झाली आहे, मला खूप बरं वाटतं. अगदीच कुठे वार्डरोब मालफंक्शन झालं तर मला त्याचा काहीच फरक पडणार नाही. माझ्याकडे असं काही नवीन नाहीये जे कुणी कधीच पाहिलं नसेल. जे इतरांकडे आहे तेच माझ्याकडे आहे, फक्त साईजचा फरक आहे.”
उर्फीचं एक नवं गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं आणि ते त्यांच्या पसंतीस उतरलं आहे. अवघ्या काही तासांतच उर्फीच्या या नव्या गाण्याला ४४ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. उर्फी तिच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते. ‘बिग बॉस’च्या घरातील साजिद खानच्या एन्ट्रीवरुनही तिने संताप व्यक्त केला होता.