बॉलीवूड अभिनेत्री व नवनिर्वाचित खासदार कंगना रणौत यांना चंदीगढ विमानतळावर एका सीआयएसएफ महिला सुरक्षारक्षकाने थोबाडीत लगावली. गुरुवारी संध्याकाळी घडलेल्या या प्रकरणाची सध्या खूपच चर्चा होत आहे. या प्रकरणी कुलविंदर कौर नावाच्या या महिला सुरक्षारक्षकाला निलंबित करण्यात आलं आहे. आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात एका बिझनेसमनने कुलविंदर कौरला एक लाख रुपयांचे बक्षीस देणार असल्याचं म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कृषी कायद्यांचा विरोध करण्यासाठी शेतकरी आंदोलन झालं होतं, त्यासंदर्भात कंगनाने केलेल्या वक्तव्यामुळे नाराज असलेल्या कुलविंदरने विमानतळावर कंगनांच्या थोबाडीत लगावली. दिल्लीच्या सीमांवर कृषी कायद्यांचा विरोध करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या महिला प्रत्येकी १०० रुपये घेऊन तिथे बसल्या आहेत, असं कंगना म्हणाल्या होत्या. तसेच कंगना यांनी शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हटलं होतं. याच रागातून कुलविंदर कौरने कंगना यांना थोबाडीत लगावल्याच म्हटलंय. याप्रकरणी कुलविंदरला निलंबित करण्यात आलं आहे, पण कंगना यांना मारल्याबद्दल तिला एक लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.

कंगना रणौत यांच्या कानशि‍लात लगावणं पडलं महागात; सीआयएसएफच्या महिला सुरक्षारक्षक निलंबित

चंदीगढ विमानतळावर घडलेल्या या घटनेनंतर सोशल मीडियावर काही लोक कुलविंदर कौरला पाठिंबा देत आहेत, तर काही जण कंगना रणौत यांच्या बाजूने आहेत. अशातच आता सोशल मीडियावर एका बिझनेसमनचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. कंगना राणौत यांना कानशिलात लगावल्याबद्दल सीआयएसएफ सुरक्षारक्षक कुलविंदर कौरला १ लाख रुपयांचं बक्षीस देणार असल्याचं झिरकपूर, मोहाली येथील व्यावसायिक शिवराज सिंह बैंस यांनी जाहीर केलं आहे.

चंदीगढ विमानतळावर महिला कर्मचाऱ्याने कानशिलात लगावल्यानंतर कंगना रणौत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “आतंकवाद…”

पाहा व्हिडीओ

कंगना यांना मारल्यावर कुलविंदर कौर काय म्हणाली होती?

या घटनेनंतर समोर आलेल्या एका व्हिडीओत कुलविंदर म्हणते की, शेतकरी आंदोलनादरम्यान कंगना यांनी म्हटलं होतं की त्या महिला १०० रुपयांसाठी आंदोलन करत होत्या. कंगना तिथे बसू शकल्या असत्या का? कंगना यांनी जेव्हा हे वक्तव्य केलं होतं, तेव्हा आपली आई तिथे आंदोलन करत होती, असं तिने म्हटलं.

पार्किंगचा वाद अन् भररस्त्यात बाचाबाची; रवीना टंडनने प्रकरणावर सोडलं मौन, म्हणाली, “आता…”

कंगना रणौत यांची प्रतिक्रिया

“मला अनेकजण फोन करत आहेत. मी पूर्णपणे सुरक्षित आहे. सुरक्षा तपासणीदरम्यान चंदीगढमध्ये ही घटना घडली. मी सुरक्षा तपासणीदरम्यान जात असताना दुसऱ्या केबिनमध्ये सीआयएसएफची एक महिला कर्मचारी होती. त्यांनी माझ्या जाण्याची वाट पाहिली, मी पुढे गेल्यावर त्यांनी जवळ येत मला कानशिलात लगावली. मी त्यांना याबाबत विचारलं असता त्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचं म्हणाल्या. पंजाबमध्ये दहशतवाद व उग्रवाद वाढत असून तो कसा रोखायचा?” असा प्रश्न कंगना यांनी व्हिडीओ शेअर करत विचारला.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mohali businessman shivraj singh bains announced award to cisf constable kulwinder kaur for slapping kangana ranaut hrc