Urmila Matondkar Mohsin Akhtar Mir Divorce News: बॉलीवूड अभिनेत्री व राजकारणी उर्मिला मातोंडकर हिच्या घटस्फोटाची बातमी समोर आली आहे. उर्मिलाने चार महिन्यांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज दिला आहे. ती ८ वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर पती मोहसीन अख्तर मीर याच्यापासून विभक्त होत आहे. दोघांनी २०१६ मध्ये लग्न केलं होतं.
उर्मिला व मोहसीन यांनी अद्याप घटस्फोटाच्या वृत्तांवर प्रतिक्रिया दिलेली नाही. न्यायालयातील एका सूत्राने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या वृत्तानुसार, उर्मिला व तिचा पती मोहसीन दोघे काही काळापासून वेगळे राहत आहेत. आता उर्मिलाने घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. हा घटस्फोट परस्पर सहमतीने होत नसल्याची माहिती समोर आली आहे. अशातच दोघांच्या घटस्फोटाच्या वृत्तानंतर मोहसीनने एक पोस्ट शेअर केली आहे.
हेही वाचा – Urmila Matondkar Divorce: कोण आहे मोहसीन अख्तर मीर, काय करतो? जाणून घ्या
मोहसीन अख्तर मीर सध्या काश्मीरमध्ये आहे. तिथूनच त्याने लहान मुलांबरोबरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. मोहसीन लहान मुलांबरोबर शेतात फेरफटका मारताना आणि गप्पा मारताना दिसत आहे. “ज्यातून तुम्ही दोषमुक्त होऊ शकता तोच तुमच्यासाठी योग्य मार्ग आहे,” असं रुमीचं वाक्य कॅप्शनमध्ये लिहून त्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
उर्मिला व मोहसीन दोघेही फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या भाचीच्या लग्नात २०१४ मध्ये भेटले होते. तिथे मोहसीन उर्मिला पाहताक्षणी प्रेमात पडला होता. नंतर दोघांच्या भेटीगाठी वाढल्या आणि त्यांनी २०१६ मध्ये लग्न केलं. उर्मिला मोहसीनपेक्षा १० वर्षांनी मोठी आहे. मोहसीन अख्तर मीर हा मुळचा काश्मीरचा आहे. तो मॉडेल आणि व्यावसायिक आहे. तो फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राबरोबर काम करतो.