बॉलीवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे आमिर खान हा आहे. आपल्या प्रत्येक चित्रपटातून वेगवेगळ्या भूमिका साकारत या अभिनेत्याने आपला एक वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे. मात्र ‘दंगल’, ‘सरफरोश’, ‘रंग दे बसंती’, ‘फना’, ‘गजनी’ अशा अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटात काम करणाऱ्या आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट मात्र बॉक्स ऑफिसवर कमाल करू शकला नाही. मात्र हा चित्रपट अपयशी ठरल्यावर आमिर खानने काय केले, याचा खुलासा त्याची सहकलाकार मोना सिंगने केला आहे.

काय म्हणाली मोना सिंग?

मोना सिंगने नुकतीच सिद्धार्थ कननच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तिने आमिर खानबरोबर असलेल्या गोष्टींचा खुलासा केला आहे. मोना सिंग म्हणते की, मी जेव्हा अडचणीत असते तेव्हा कधीही मी आमिरला कधीही कॉल करत नाही. पण जेव्हा आम्ही सेटवर असतो, तेव्हा मी त्याला खूप प्रश्न विचारते. ही स्क्रीप्ट अशीच का आहे? एखादी गोष्ट अशा पद्धतीने का आहे. तो खूप बुद्धीमान आहे. त्याला सगळ्या गोष्टी माहीत असतात. त्याला माहित असतं की, कधी काय करायचं आहे. मला त्याच्याबद्दल खूप आदर वाटतो आणि मला वाटते की मला त्या भाग्यवान कलाकरांपैकी एक आहे, ज्यांना आमिर खानबरोबर काम करण्याची संधी मिळाली. दोन दशकात मी त्याच्याबरोबर दोन वेळा काम केले.

salman khan reacted on aishwarya rai abhishek bachchan marriage
ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनशी लग्न केल्यानंतर सलमान खान म्हणालेला, “माझ्या आयुष्याचा एक…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Kal ho naa ho
“तिथे उपस्थित असलेल्या…”, ‘त्या’ सिनेमातील शाहरुख खानच्या मृत्यूच्या सीनबद्दल अभिनेत्रीचा मोठा खुलासा
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
Neelam Kothari And Mahesh Thakur
“मी तिच्या अंगावर पडलो अन् नीलमने…”, अभिनेत्याने सांगितला ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगचा किस्सा; म्हणाला, “त्यानंतर सलमानने…”
Vikrant Massey Family Live in Godown
“घरातून बाहेर काढलं, वर्षभर गोदामात राहिलो…”; बॉलीवूड अभिनेत्याने सांगितल्या कठीण काळातील आठवणी
Vikrant Massey family religion variety
“माझे ख्रिश्चन वडील ६ वेळा वैष्णोदेवीला गेले, तर मुस्लीम भाऊ…”; बॉलीवूड अभिनेत्याचा कुटुंबाबद्दल खुलासा

हेही वाचा: Video: दिवंगत तिशा कुमारच्या वडिलांना पाहून ढसाढसा रडला सोनू निगम; व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी

मोना सिंगने लाल सिंग चड्ढा या चित्रबपटात आमिर खानच्या आईची भूमिका साकारली होती. या चित्रपटाबद्दल बोलताना तिने म्हटले की, जेव्हा लाल सिंग चड्ढा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही, कमाई करू शकला नाही, त्यावेळी खूप दु:ख झाले. कारण- आम्ही इतक्या दिवस शूटिंग केले होते आणि एक सुंदर चित्रपट बनवला होता. पण चित्रपटगृहात या चित्रपटाला फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नाही. आम्ही सगळेच तुटलो होतो. मात्र जेव्हा हा चित्रपट ‘नेटफ्लिक्स’वर आला तेव्हा या चित्रपटाचे खूप कौतुक झाले. लोकांकडून खूप प्रेम मिळाले. जरी चित्रपटगृहात हा चित्रपट चालला नसला तरी येत्या वर्षात याचा चाहतावर्ग निर्माण होईल, असा माझा विश्वास आहे. पुढे तीने म्हटले आहे की, या चित्रपटाच्या अपयशानंतर आमिर खानने पार्टी दिली होती. त्याने त्यावेळी म्हटले होते की, चित्रपट चालला नाही म्हणून काय झाले? आपण सगळ्यांनी मेहनत केली आहे. त्यामुळे अपयश आले म्हणून आपण आनंद साजरा करणे थांबवू शकत नाही. त्याने त्या चित्रपटाच्या अपयशाची जबाबदारी घेतली आणि त्यामुळे मला त्याच्याबद्दल खूप प्रेम आणि आदर वाटतो.

दरम्यान, ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटात मोनाने आमिरच्या आईची भूमिका साकारली होती. त्यामुळे तिच्यावर सातत्याने टीका करण्यात येत होती. मात्र आमिरने कोणत्याही वयाच्या भूमिकेमध्ये काम करून ते पात्र लोकांपर्यंत पोहचवण्याची कमाल कलाकाराची असते, असे त्याने म्हटले होते.