‘गदर २’ हा चित्रपट यावर्षीच्या बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. २ दशकापूर्वीच्या सुपरहिट ‘गदर: एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. ‘गदर २’ मध्ये पुन्हा एकदा सनी देओल आणि अमीषा पटेलची जोडी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. तर आता निर्मात्यांनी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘गदर २’ हा चित्रपट गेले अनेक महिने चर्चेत आहे. या चित्रपटाबद्दल अनेक अपडेट्स समोर येत होते. याचबरोबर या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे काही व्हिडीओ आणि फोटोही व्हायरल झाले होते. या सगळ्यामुळे या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता आणखीन वाढली होती. त्यामुळे या चित्रपटाची पहिली झलक पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर होते.

आणखी वाचा : पुन्हा एकदा तारा सिंगची भूमिका साकारण्यासाठी सनी देओलने आकारले ‘इतके’ मानधन, आकडा वाचून व्हाल थक्क

तर आता निर्मात्यांनी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे. परंतु हा टीझर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यात आलेला नाही. तर हा टीझर पाहण्यासाठी प्रेक्षकांना चित्रपटगृहात जावं लागणार आहे. नुकताच ‘गदर: एक प्रेम कथा’ हा चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला. जे प्रेक्षक हा चित्रपट चित्रपटगृहात पाहतील त्यांना ‘गदर २’चा टीझर पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा : Video: बहुप्रतीक्षित ‘गदर २’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल, शेवटच्या दिवशी ‘असा’ शूट झाला ॲक्शन सीन

या टीझरच्या सुरुवातीला सनी देओलचा परिचय करून देणारा एक संवाद आहे, ज्यामध्ये एक महिला म्हणते की, “तो पाकिस्तानचा जावई आहे, त्याला नारळ द्या, टीळा लावा, अन्यथा तो हुंड्यासाठी लाहोरला घेऊन जाईल.” लोकांना हा संवाद इतका आवडला आहे की चित्रपटगृहांमध्ये टीझर रिलीज झाला असला तरी हा डायलॉग सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला आहे. तर काही दिवसांनी हा टीझर यूट्यूबवर प्रदर्शित केला जाईल असं सांगितलं जात आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Most awaited film gadar 2 teaser gets release but only in theatres rnv