सामान्य घरात जन्मलेल्या राखी सावंतने बॉलिवूडमध्ये स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी राखी गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. राखीचा पती आदिल खान सध्या तुरुंगात आहे. राखीने आदिलवर मारहाण व फसवणुकीचे आरोप केले आहेत. याबरोबच अश्लील व्हिडीओ बनवल्याचा आरोपही राखीने आदिलवर केला आहे. कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेल्या राखीच्या आयुष्यावर आता सिनेमा येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राखीचा भाऊ राकेश सावंतने तिच्या आयुष्यावरील सिनेमाची घोषणा केली आहे. ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत राकेशने राखीवर चित्रपट काढणार असल्याचं सांगितलं आहे. राकेश म्हणाले, “राखी राऊडी आहे. तिच्या आयुष्यात अडथळे निर्माण करणाऱ्या कोणालाही राखी सोडत नाही. त्यामुळेच मी तिच्या आयुष्यावर सिनेमा बनवणार आहे. पती आदिल खानविरोधात ती लढा देत आहे. परंतु, फक्त यामुळेच मी चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतलेला नाही. राखीने आयुष्यात अनेक कठीण प्रसंगांचा सामना केला आहे”.

हेही वाचा>> Video:…अन् वणीने सगळ्यांसमोरच नवऱ्याला केलं लिप टू लिप किस; लग्नाला महिना होताच वनिता खरातने शेअर केला ‘तो’ व्हिडीओ

राखीच्या आयुष्यावर आधारित असलेल्या चित्रपटाचं नाव राऊडी राखी असं असणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन राखीचा भाऊ राकेश सावंत करणार आहेत. तर गौरव अग्रवाल या चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचं राकेश म्हणाले. या चित्रपटात राखी मुख्य भूमिका साकारणार असून सयाजी शिंदे, अनू कपूर, मनोज जोशी यांनाही भूमिकेसाठी विचारण्यात येणार असल्याचं राकेश यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा>> हृदयविकाराचा झटका येण्याआधी सुश्मिता सेनला झालेला ‘हा’ गंभीर आजार, अभिनेत्रीनेच केलेला खुलासा, म्हणाली “आठ तासांनी मला…”

आदिलला व राखीने मे २०२२ मध्ये कोर्ट मॅरेज केलं होतं. त्यानंतर त्यांनी निकाहही केला होता. लग्नाच्या सात महिन्यांनंतर राखीने याचा खुलासा केला होता. अनेक दिवसांच्या ड्राम्यानंतर आदिलने राखीबरोबर लग्न केल्याचं मान्य केलं होतं. राखीचा पती आदिल खानवर इराणी महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. याप्रकरणी त्याची म्हैसूर पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. आदिलला तुरुंगात टाकल्यानंतर राखीने पुन्हा चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. लवकरच ती नव्या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Movie based on rakhi sawant life actress brother rakesh sawant announcement kak