आपल्या आवाजने रसिक प्रेक्षकांची मन जिंकलेले गायक किशोर कुमार यांचे १३ ऑक्टोबर १९८७ रोजी निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली होती. हिंदी चित्रपटसृष्टी व्यतिरिक्त त्यांनी बंगाली, हिंदी, मराठी, आसामी, गुजराती, कन्नड, भोजपुरी, मल्याळम, उडिया आणि उर्दूसह अनेक भारतीय भाषांमध्ये गाणी गायली आहेत. आजही चाहते त्यांची आठवण काढत असतात. त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने मध्यप्रदेश सरकारने भारतीय चित्रपटसृष्टीतील तीन प्रस्थापित कलाकारांना राष्ट्रीय किशोर कुमार पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
१३ ऑक्टोबर निमित्त मध्यप्रदेशातील खांडवा येथे या कलाकारांचा ‘किशोर कुमार अलंकरण’ या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. ज्याच्या सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री उषा ठाकूर खांडवा येथे रंगारंग कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करणार आहेत. हा पुरस्कार भारतीय चित्रपटसृष्टीतील पटकथा लेखक अशोक मिश्रा, गीतकार अमिताभ भट्टाचार्य आणि चित्रपट दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांना देण्यात येणार आहे. करोना महामारी आणि निवडणूक आचारसंहितेमुळे गेल्या ३ वर्षांपासून हे पुरस्कार देण्यात आले नाहीत.
खांडवा येथील त्यांच्या समाधीस्थळी श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम होणार आहे. तसेच सायंकाळी ७ वाजता खांडव्यातील जुन्या धान्य मार्केटमध्ये सजावट करण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळ्यानंतर देबोजित शहा यांचा सुगम संगीताचा वाद्यवृंद सादर होणार आहे. मध्य प्रदेश सरकारच्या सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर या कलाकारांचा सत्कार करणार आहेत. या सन्मानार्थ २ लाख रुपये रोख आणि सन्मानपत्र देण्यात येणार आहे.
किशोर कुमार मूळचे खांडव्याचे असून ४ ऑगस्ट १९२९ मध्ये त्यांचा जन्म झाला. किशोर कुमार यांचे मूळ नाव आभास कुमार गांगुली होते. किशोर कुमार हे चार भावंडांपैकी चौथे होते. आयुष्याच्या प्रत्येक क्षणी त्यांना खांडवा आठवायचे, त्यांनी आपली शेवटची इच्छा सांगितली होती की त्यांना मरण हे आपल्या खांडव्या शहरात यावे मात्र त्यांचा मृत्यू मुंबईमधील राहत्या घरी झाला, मात्र त्यांच्या मुलाने त्यांचे अंत्यसंस्कार हे खांडव्यात केले आहेत.