शाहरुख खान व दीपिका पदुकोणच्या ‘पठाण’ चित्रपटाची चाहते अनेक दिवसांपासून वाट बघत आहेत. हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट जानेवारी २०२३मध्ये चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटातील कलाकारांचे लूक आणि यातील गाणी सध्या रिलीज केली जात आहेत. दोन दिवसांपूर्वी चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे गाणं प्रदर्शित झालं, पण त्यानंतर वेगळाच वाद सुरू झालाय. या वादामुळे चित्रपटावर बॉयकॉटचं सावटही पसरलंय.
“माझ्या आयुष्यातील…” लग्नानंतर ‘साथिया’ फेम देवोलीनाची पहिली पोस्ट; पतीबरोबरचे फोटो केले शेअर
‘पठाण’ चित्रपटाची झलक प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट चर्चेत आहे. नुकतंच या चित्रपटातील एक गाणं प्रदर्शित झाले आहे. या गाण्यावरून सध्या अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. या गाण्यात दीपिकाचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. शाहरुख खान आणि दीपिकावर हे गाणं चित्रित झालं आहे. मात्र या गाण्यात दीपिकाने एक केशरी रंगाची बिकिनी परिधान केली आहे आणि गाण्याचे शब्द आहेत ‘बेशरम रंग’, यामुळे नवीन वादाला तोंड फुटलंय. हिंदू महासभेने या गाण्यावर आणि दीपिकाच्या कपड्यांवर आक्षेप घेतला आहे. हिंदू महासभेचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांच्या मते ‘पठाण’ चित्रपटात भगव्या रंगाचा अपमान केला आहे. त्यानंतर आता भाजपा नेत्यानेही चित्रपटावर टीका केली आहे.
मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी चित्रपटात दीपिकाच्या बिकिनीच्या रंगासह गाण्याच्या बोलांवरही आक्षेप नोंदवला आहे. “‘पठाण’ हा चित्रपट दोषपूर्ण असून विषारी मानसिकतेवर आधारित आहे. ‘बेशरम रंग’ गाण्याचे बोल आणि गाण्यात घातलेले भगवे आणि हिरवे कपडे यामध्ये निर्मात्यांनी बदल करणे आवश्यक आहे. नाही तर चित्रपटाचे प्रदर्शन मध्य प्रदेशात होऊ द्यायचे की नाही याचा निर्णय आम्ही घेऊ,” असं गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी म्हटलंय.
गृहमंत्री मिश्रा यांनी दीपिकावर चित्रित करण्यात आलेले काही सीन्स बदलण्याची मागणी केली आहे. असे न केल्यास आपल्या राज्यात चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.