बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या येत आहेत. अनेक रिपोर्ट्समध्ये दोघेही लग्न करणार आहेत, असा दावा केला जात आहे. नुकतेच पुन्हा एकदा परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा विमानतळावर एकत्र दिसले. त्यानंतर लग्नाच्या चर्चांना उधाण आलंय.
हेही वाचा- ‘भोला’च्या अपयशानंतर अभिनेत्याने लगावला अजय देवगणला टोला; म्हणाला, “तुझं नाव…”
परिणीती व राघव चड्ढा यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आप खासदार संजय अरोरा यांनी शुभेच्छा देत या दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं होतं. त्यानंतर पंजाबी गायक हार्डी सिंधुनेही परिणीती व राघव चड्ढा यांना शुभेच्छा दिल्या होत्या. तेव्हापासून परिणीती व राघव चड्ढा यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. परिणीती व राघव चड्ढा विवाहबंधनात अडकणार असून लवकरच त्यांच्या साखरपुडा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा- इंडस्ट्रीमध्ये जास्त काम का करत नाहीस? मलायका अरोरा म्हणते, “लोक मला…”
दोघांच्या लग्नाच्या चर्चा जोर धरू लागल्यानंतर राघव चढ्ढा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवत आहेत. राघव चड्ढा शेवटचा अनफिल्टर्ड बाय समदीशच्या शोमध्ये दिसले होते. तुम्ही लव्ह मॅरेज करणार की अरेंज मॅरेज असा प्रश्न राघव यांना विचारण्यात आला होता. तेव्हा राघव म्हणाले की ते लग्नाच्या शोधात आहेत. शोमध्ये जेव्हा त्यांना विचारण्यात आले की, तुमच्या घरी खूप स्थळ येत असतील. त्यावर राघव चड्ढा हसले आणि म्हणाले, तुमच्या नजरेत चांगली मुलगी असेल तर सांगा? या उत्तरानंतर राघव चड्ढा आणि शो होस्ट दोघेही हसताना दिसत आहेत.
हेही वाचा-“मी दिल्लीत…”; दिव्या भारतीच्या मृत्यूबाबत शाहरुख खानचा मोठा खुलासा
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढांनी गेल्या महिन्यात मुंबईत एकत्र डिनर केलं होतं. त्यानंतर दोघे लवकरच साखरपुडा आणि लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. जेव्हा पेपराजींनी राघव आणि परिणीतीला त्यांच्या लग्नाबद्दल विचारले तेव्हा दोघेही हसताना आणि लाजताना दिसले. मात्र, दोघांनीही अद्याप आपल्या नात्याबद्दल खुलासा केलेला नाही.