जान्हवी कपूर व राजकुमार राव यांचा ‘मिस्टर अँड मिसेज माही’ हा चित्रपट शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी सिनेमागृहांमध्ये गर्दी केल्याचं दिसून आलं. आता या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईची आकडेवारी समोर आली आहे.
‘मिस्टर अँड मिसेस माही’ हा २०२४ मधील बहुप्रतिक्षित चित्रपट होता. क्रिकेट आणि रोमान्सचे ट्विस्ट असलेल्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. जान्हवी व राजकुमार यांनी या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले होते. अखेर ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या शुक्रवारी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग केली आहे. ४० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या ‘मिस्टर अँड मिसेस माही’ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी किती कमाई केली आहे, ते जाणून घेऊयात.
‘मिस्टर अँड मिसेस माही’ ची पहिल्या दिवसाची कमाई
‘मिस्टर अँड मिसेस माही’ चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. सोशल मीडियावरही या चित्रपटाचे खूप कौतुक होत आहे. खासकरून राजकुमार आणि जान्हवीच्या अभिनयाची खूप चर्चा होत आहे. अशातच रिलीजच्या पहिल्याच दिवशी हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली आणि यासोबतच ‘मिस्टर अँड मिसेस माही’ने शानदार ओपनिंग केली आहे. इंडस्ट्री ट्रॅकर ‘सॅकनिल्क’च्या आकडेवारीनुसार, या चित्रपटाने पहिल्या दिवशी सात कोटी रुपयांची कमाई केली आहे.
४० फ्लॉप चित्रपट देऊनही ‘हा’ अभिनेता थाटात जगतो आयुष्य, तब्बल ‘इतक्या’ कोटींच्या संपत्तीचा आहे मालक
अॅडव्हान्स बुकिंगमध्ये चांगली कमाई
‘मिस्टर अँड मिसेस माही’ने रिलीजपूर्वीच अॅडव्हान्स बुकिंगमध्ये चांगले कलेक्शन केले होते. राजकुमार राव आणि जान्हवी कपूरच्या चित्रपटाने २०२४ मध्ये रिलीज झालेल्या ‘फायटर’, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’सह अनेक मोठ्या चित्रपटांच्या अॅडव्हान्स बुकिंग कलेक्शनचे रेकॉर्ड मोडले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘मिस्टर अँड मिसेस माही’ने पहिल्या दिवशी २.१५ लाख रुपयांचा व्यवसाय केला. तर फायटरने पहिल्या दिवशी सुमारे १.४५ लाख रुपयांचा व्यवसाय केला होता आणि ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये १.०३ लाख रुपयांचा व्यवसाय केला होता.
आई-वडील झोपल्यावर मध्यरात्री त्यांच्या खोलीत जायची जान्हवी कपूर, कारण सांगत म्हणाली…
सिनेमा लव्हर्स डेचा फायदा
दुसरीकडे ‘मिस्टर अँड मिसेस माही’ला सिनेमा लव्हर्स डेला रिलीज करण्याचा फायदा झाला. चित्रपटाची तिकिटं शुक्रवारी फक्त ९९ रुपयांमध्ये मिळत होती, त्यामुळे ‘मिस्टर अँड मिसेस माही’ला थिएटरमध्ये खूप प्रेक्षक मिळाले. वीकेंडलाही हा चित्रपट दमदार कमाई करेल असं दिसत आहे.
© IE Online Media Services (P) Ltd