‘हाय नन्ना’ या दाक्षिणात्य चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यामध्ये बापलेकीच्या नात्याची हृदयस्पर्शी कथा मांडण्यात आली आहे. सुपरस्टार नानी आणि बालकलाकार कियारा खन्ना यांच्या यामध्ये प्रमुख भूमिका आहेत. सध्या या चित्रपटातील अनेक भावनिक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हा चित्रपट ७ डिसेंबर २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘हाय नन्ना’मध्ये सुपरस्टार नानीसह दोन मराठमोळ्या अभिनेत्रींनी स्क्रीन शेअर केली आहे. या दोघींच्या अभिनयाचं सध्या सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. पडद्यावर या दोघींनी मायलेकींची भूमिका साकारली आहे. या दोन अभिनेत्री नेमक्या कोण आहेत जाणून घेऊयात…

हेही वाचा : Fighter Trailer : देशभक्ती, पुलवामा हल्ला अन्…; हृतिक व दीपिकाच्या बहुचर्चित ‘फायटर’चा ट्रेलर प्रदर्शित

‘हाय नन्ना’चं संपूर्ण कथानक विराज (नानी) व त्याची लेक माहीभोवती फिरतं. यामध्ये बॉलीवूड अभिनेत्री मृणाल ठाकूरने विराजची पत्नी व माहीची आई म्हणजेच ‘यशना’ हे पात्र साकारलं आहे. तसेच मृणाल ठाकूरच्या आईच्या भूमिकेत चित्रपटात ‘तू तेव्हा तशी’ फेम अभिनेत्री शिल्पा तुळसकर झळकली आहे.

हेही वाचा : Video: मराठमोळ्या सासूबाईंनी आयरा खानचं कुटुंबात ‘असं’ केलं स्वागत; व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या, “तू आमच्या…”

मृणाल ठाकूरने बॉलीवूडसह आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपला जम बसवला आहे. याशिवाय शिल्पा तुळसकर मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. शिल्पाने नुकताच ‘हाय नन्ना’च्या सेटवरचा मृणालबरोबरचा खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये या दोघींचं ऑफस्क्रीन सुंदर असं बॉण्डिंग पाहायला मिळत आहे. खरंतर ‘हाय नन्ना’ चित्रपटात शिल्पाने मृणालच्या खाष्ट आईची भूमिका साकारली आहे. त्यामुळे या ऑनस्क्रीन मायलेकींचं ऑफस्क्रीन गोड नातं पाहून सध्या नेटकरी या मराठमोळ्या अभिनेत्रींवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mrunal thakur and shilpa tulaskar plays important role in hi nanna south film sva 00