मृणाल ठाकूर बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अभिनयाबरोबर मृणाल तिच्या वैयक्तिक कारणामुळेही चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच मृणाल तेलगू अभिनेत्याबरोबर लग्न करणार असल्याची चर्चा सुरु होती. आता या चर्चांवर मौन सोडत मृणालने स्पष्टीकरण दिलं आहे.
हेही वाचा- सलमानच्या चाहत्यांना मिळणार डबल सरप्राईज; ‘टायगर ३’ मध्ये शाहरुखबरोबर ‘हा’ अभिनेताही करणार कॅमिओ
मृणाल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. निरनिराळे व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत ती चाहत्यांना अपडेट देत असते. गेल्या काही दिवसांपासून मृणाल एका तेलगू अभिनेत्याला डेट करत असल्याची चर्चा सुरु होती. एवढंच नाही तर मृणाल त्या अभिनेत्याबरोबर लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचेही सांगण्यात येत होते. या बातमीमुळे मृणालच्या चाहत्यांमध्ये आनंदाच वातावरण पाहायला मिळत होतं. मात्र, मृणालने आता आपल्या लग्नाबाबत मोठी माहिती दिली आहे.
नुकतच मृणालने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत तिच्या लग्नाच्या चर्चांवर मौन सोडलं आहे. व्हिडीओमध्ये मृणाल म्हणाली. नमस्कार मित्रांनो, “तुमचे हृदय तोडण्यासाठी मला खूप वाईट वाटतय. गेल्या १ तासापासून अनेक स्टायलिस्ट, डिझायनर आणि मित्र आणि कुटुंबीयांनी मला फोन करुन मी कोणत्या तेलगू अभिनेत्याबरोबर लग्न करणार आहे याबाबत विचारणा केली होती. तो तेलगू मुलगा नेमका कोण आहे हे मलासुद्धा जाणून घ्यायचं आहे.”
मृणाल पुढे म्हणाली, “मला माफ कर. या सर्व खोट्या अफवा आहेत. पण या इतक्या मजेदार अफवा आहेत कि मी ते स्पष्ट करु शकत नाही. तुम्ही माझ्यासाठी मुलगा शोधा आणि मला सांगा त्याचबरोबर मला लग्नस्थळाचा पत्ताही सांगा”
हेही वाचा- बॉलीवूडमध्ये पदापर्णानंतर राज कुंद्राला करायचंय ‘या’ अभिनेत्रीबरोबर काम; खुलासा करत म्हणाला…
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, मृणाल ठाकूर शेवटची आंख मिचोली चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिच्याबरोबर परेश रावल, शर्मन जोशी आणि दिव्या दत्ता यांच्या प्रमुख भुमिका होत्या. हा मृणाल लवकरच ‘पिप्पा’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर मुख्य भूमिकेत आहे. १० नोव्हेंबरला अमेझॉन प्राईमवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात मृणालबरोबर इशान खट्टर सोनी राजदान आणि प्रियांशू मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.