अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) सोशल मीडियावर सक्रिय असते. ती अनेकदा तिचे अनेक लहान व्हिडीओज, रिल्स सोशल मीडियावर शेअर करत असते. मृणाल या रिल्स शूटिंग सेटवर, किंवा मेकअप रूममध्ये असताना मिळणाऱ्या वेळात शेअर करते. याच रिल्समधून ती अनेकदा हलकेफुलके क्षण शेअर करते. यात ती कधी मराठी गाणी म्हणते, कधी अहिराणी भाषेत बोलते तर कधी तिच्या सहकाऱ्यांबरोबर गमतीदार व्हिडीओ शेअर करते. आता मृणालने असाच एक नवी रील शेअर केली आहे.

मृणालने नवी रील इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केली आहे. यात तिने शूटिंग संपल्यानंतर रील शेअर केला असून यात ती अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ या सिनेमातील ‘पीलिंग्स’ गाण्यावर लिपसिंग करत सुंदर एक्स्प्रेशन दिले आहेत. शूटिंग संपल्याचा आनंद म्हणून आवडत्या गाण्यावर डान्स हे कॅप्शन तिने रीलवर लिहिले आहे. पॅकअपच्या आनंदात मृणालने ही रील तयार केली आहे.

हेही वाचा…दिलजीत दोसांझने एपी ढिल्लनच्या आरोपांना दिले उत्तर; ब्लॉक प्रकरणावर स्पष्टीकरण देत गायक म्हणाला, “माझे सरकारशी…”

या रीलच्या सुरुवातीला गाणे सुरु झाल्यावर मृणाल गाण्यांच्या संगीताबरोबर तिच्या भुवया वरखाली करते. त्यानंतर गाण्यांच्या कडव्यानुसार चेहऱ्याचे हावभाव बदलत उत्कृष्ट एक्स्पेशन देते. या रीलवर मृणाल गादीवर झोपल्याचे दिसत आहेत. व्हिडीओच्या शेवटी आपला हात चेहऱ्यावर ठेवत मृणाल ‘पीलिंग्स’ गाण्यांवर जागेवरच स्टेप्स करते. मृणालने रीलवर मी कोळंबी फ्राईड राईस खाल्ल्याने मला डान्स करावा लागला असे लिहिले आहे.

मृणालने शूटिंग संपल्यानंतर रील शेअर केला असून यात ती अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ या सिनेमातील ‘पीलिंग्स’ गाण्यावर लिपसिंग करत सुंदर एक्स्प्रेशन दिले आहेत.( VideoCredit – Mrunal Thakur Instagram)

मृणालने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अनेक व्हिडीओज शेअर केल्या आहेत. या सर्व व्हिडीओत मृणालने अनेकदा मराठीत बोलताना स्टोरी शेअर केल्या आहेत.तिने याआधी मराठी बोलताना, मराठी गाणी म्हणताना व्हिडीओज शेअर केल्या आहेत. मृणालला इन्स्टाग्रामवर तिच्या एका चाहत्याने ती मराठी आहे का? हा प्रश्न विचारला होता. हे सांगताना मृणालने तिच्या सहकाऱ्यांसह ती मराठी आहे हे दाखवण्यासाठी एक गाणे म्हणून दाखवले. मृणालने तिच्या सहकाऱ्यांसह ‘सांग सांग भोलानाथ’ हे गाणे म्हणून दाखवले होते.

हेही वाचा…दिलजीत दोसांझने एपी ढिल्लनच्या आरोपांना दिले उत्तर; ब्लॉक प्रकरणावर स्पष्टीकरण देत गायक म्हणाला, “माझे सरकारशी…”

मृणाल ठाकूरने ‘मुझसे कुछ केहती है…ये खामोशीया’ या हिंदी मालिकेतून अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. तिला ‘कुम कुम भाग्य’ या मालिकेतून खरी ओळख मिळाली. पुढे तिने ‘लव्ह सोनिया’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. मृणालने ‘सुपर ३०’ चित्रपटात हृतिक रोशनबरोबर स्क्रीन शेअर केली होती. तिचा ‘सीता रामम’ हा सिनेमा लोकप्रिय झाला. आता मृणाल ठाकूर लवकरच ‘सन ऑफ सरदार २’ या चित्रपटात दिसणार आहे.

Story img Loader