अभिनेत्री मृणाल ठाकुरने टीव्ही मालिकांमध्ये काम केलं, त्यानंतर तिच्या अभिनयाच्या जोरावर तिने बॉलिवूडमध्ये काम मिळवलं. तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. मृणाल सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. नुकताच मृणालचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोवरुन ती लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
मृणाल ठाकूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिने नुकतीच तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये ती वधूच्या रुपात दिसत आहे. दरम्यान, मृणालने लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. तिने आपल्या हातावर मेंदी लावली आहे. तसेच तिने गळ्यात हिरव्या रंगाचा सुंदर हार गळ्यात सोनेरी चोकर घातला आहे. कपाळावर मांग टिका आणि कानात झुमके घातले आहेत. नवऱ्या मुलीच्या वेशात मृणाल खूपच सुंदर दिसत आहे. हा फोटो शेअर करताना मृणालने कॅप्शनमध्ये लिहिले “जस्ट इन, माझ्या महत्वाच्या दिवसाचे न पाहिलेले चित्र’.
मृणालने कॅप्शनमध्ये ‘मेड इन हेवन २’ वेबसिरीजच्या प्रदर्शनाची तारीखही सांगितली आहे. ही वेबसिरीज १० ऑगस्टपासून प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. ‘पूजा मेरी जान’, ‘पिप्पा’, ‘आँख मिचोली’, ‘नानी ३०’ हे मृणालचे आगामी चित्रपट आहेत. सध्या ती चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. तर, ती अखेरची ‘सीता रामम’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होती. तिची दुल्कर सलमानबरोबरची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती.