‘सिता रामम’, ‘हाय नन्ना’ अशा चित्रपटांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी मृणाल ठाकूर ही आताच्या घडीची लोकप्रिय अभिनेत्री आहे. दाक्षिणात्य, तसेच बॉलीवूड सिनेसृष्टीतही तिच मोठे योगदान आहे. कमी काळातच प्रसिद्धीझोतात आलेली ही अभिनेत्री सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डिसेंबरला प्रदर्शित झालेला ‘हाय नन्ना’ हा चित्रपट हिट तर ठरलाच; परंतु त्याने बॉक्स ऑफिसवरही चांगली कामगिरी केली.

अलीकडेच झालेल्या एका मुलाखतीत हिंदी रोमॅंटिक चित्रपटांबाबत तिचे मत विचारले असता, ती म्हणाली, “मी निर्मात्यांसमोर स्वत:ला सिद्ध करून थकली आहे.”

हेही वाचा… सोनाली कुलकर्णीच्या ‘या’ मल्याळम चित्रपटाने दोन दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी

‘पिंकविला’सह झालेल्या मुलाखतीत मृणाल ठाकूरने हिंदी चित्रपटसृष्टीवर आपले मत व्यक्त केले.

हिंदी सिनेसृष्टी मृणाल ठाकूरचा योग्य रीतीने वापर करून घेत नाही, असे कमेंट्समध्ये वाचले जातेय. हिंदीत तुला लव्ह स्टोरीज ऑफर होतात का, असे मुलाखतदाराने विचारल्यावर मृणाल म्हणाली, “मला लव्ह स्टोरीज ऑफर होत नाहीत. मला माहीत नाही याचं कारण नक्की काय आहे. कदाचित मी इतकी प्रसिद्ध नसेन म्हणूनच मला लव्ह स्टोरीज मिळत नसतील.”

हेही वाचा… चित्रपटांसाठी कलाकारांना किती मानधन मिळतं? नवाजुद्दीन सिद्दीकीने सांगितली आकडेवारी, म्हणाला, “कधी ते…”

“मला खूप चित्रपटांची ऑफर येतेय. त्यात काम करायलाही मला आवडेल. पण, रोमँटिक सिनेमांची ऑफर सध्या तरी मला येत नाही. मी आता निर्मात्यांसमोर स्वत:ला सिद्ध करून थकली आहे. आता आपोआप कुठली तरी चांगली संधी चालून यावी, असं वाटतंय,” असे मृणालने नमूद केले.

एका युजरने या मुलाखतीची एक क्लिप शेअर केली आहे; जी सध्या व्हायरल होतेय. त्यावर नेटकऱ्यांनी हिंदी चित्रपट निर्मात्यांबाबत निराशा व्यक्त केली आहे.

मृणाल ठाकूर ही ‘बाटला हाउस’, ‘धमाका’, ‘जर्सी’ अशा विविध हिंदी चित्रपटांमध्ये झळकली. मृणाल ठाकूरच्या आगामी चित्रपटाबाबत सांगायचे झाले, तर ‘फॅमिली स्टार’ हा तेलुगू भाषिक चित्रपट २२ मार्चला प्रदर्शित होणार असून, या चित्रपटात साउथ स्टार विजय देवरकोंडा हा मृणालचा सहकलाकार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mrunal thakur on romantic films for bollywood movies famous actress mrunal shares her opinon dvr