अभिनेत्री मृणाल ठाकूरने रविवारी एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये ती तिचे दागिने फ्लाँट करताना दिसत होती. तिने हा व्हिडीओ शेअर केल्यावर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. अशातच तिच्या या व्हिडीओवर एका चाहत्याने कमेंट करत तिला लग्नासाठी प्रपोज केलं. विशेष म्हणजे मृणालने चाहत्याच्या या कमेंटला उत्तर दिलंय.

व्हिडीओमध्ये मृणाल तामिळ गाणं ‘उन्नाकुल नाने’ वर तिची ज्वेलरी फ्लाँट करत आहे. याच व्हिडीओवर एका चाहत्याने “मेरी तरफ से रिश्ता पक्का है” म्हणजेच माझ्याकडून या नात्याला होकार आहे, अशी कमेंट केली. त्यावर मृणालनेही मस्करीत उत्तर देत ‘माझ्याकडून नकार आहे’, अशी कमेंट केली.

मृणालच्या या कमेंटनंतर काहींनी त्या युजरला सहानभूती दाखवली. तर काहींनी मात्र मृणालने त्याची खिल्ली उडवल्याबद्दल हसणारे इमोजी कमेंट केले. मृणालने चाहत्याला दिलेल्या या उत्तराचा स्क्रीन शॉट चांगलाच व्हायरल झाला आहे.

mrunal thakur
मृणालने चाहत्याच्या कमेंटला दिलेलं उत्तर

दरम्यान, मृणाल ठाकूर शेवटची बहुभाषिक चित्रपट ‘सीता रामम’मध्ये दुल्कर सलमानबरोबर दिसली होती. एका लष्करी जवानाच्या प्रेमात पडलेल्या राजकुमारीची भूमिका तिने केली होती. अलीकडेच, ती अक्षय कुमारच्या सेल्फी चित्रपटातील “कुडिये नी तेरी” या गाण्यात झळकली होती.

Story img Loader