मृणाल ठाकुर ही फक्त बॉलीवूडच नाही तर दाक्षिणात्या सिनेसृष्टीतही आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने सुरुवातीला टीव्ही मालिकांमध्ये काम केलं, त्यानंतर अभिनयाच्या जोरावर चित्रपट मिळवले. अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारून आपल्या अभिनयाने प्रक्षकांची मनं जिंकणारी मृणाल ही मराठी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठमोळी मृणाल ठाकूर ठरली दाक्षिणात्य मनोरंजन सृष्टीतील सर्वांत महागडी अभिनेत्री! जाणून घ्या एका चित्रपटाचं मानधन

मृणाल मराठी कुटुंबात जन्मली आहे, पण ती मुळची कुठली आहे? हे तुम्हाला माहिती आहे का. काही ठिकाणी ती नागपूरची असल्याचं म्हटलंय, तर काही ठिकाणी ती मुळची धुळ्याची असल्याचं म्हटलं जातंय. या दोन्हीपैकी तिचं शहर कोणतं, याचा खुलासा खुद्द मृणालनेच एका मुलाखतीत केला आहे.

कोण आहे रवींद्र महाजनींची मुलगी? गश्मीरने शेअर केलेले बहिणीचे फोटो पाहिलेत का?

मृणाल मुळची धुळ्याची आहे. पण ती नागपुरातही काही काळ वास्तव्यास होती, असं मृणालने सांगितलं आहे. दरम्यान, मृणाल सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिने एकदा तिच्या एका रिलेशनशिपबद्दलही माहिती दिली होती. एक्स बॉयफ्रेंड तिला सोडून गेला होता. “तो पळून गेला होता. तो म्हणायचा ‘तू खूप इम्पल्सिव्ह आहेस, मी याचा सामना करू शकत नाही, तू एक अभिनेत्री आहेस, याचाही सामना मी करू शकत नाही,’” असं मृणाल त्याच्याबद्दल म्हणाली होती.

हेही वाचा – पत्नी, मुलगा, सून अन्…, असं आहे रवींद्र महाजनींचं कुटुंब

‘पूजा मेरी जान’, ‘पिप्पा’, ‘आँख मिचोली’, ‘नानी ३०’ हे मृणालचे आगामी चित्रपट आहेत. सध्या ती चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. तर, ती अखेरची ‘सीता रामम’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होती. तिची दुल्कर सलमानबरोबरची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mrunal thakur reveals she belongs to nagpur or dhule hrc