Mrunal Thakur : अभिनेत्री मृणाल ठाकूरने ‘सीता रामम’, ‘सुपर ३०’, ‘लव सोनिया’ या चित्रपटांतून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. हिंदी मालिकांमधून सुरू झालेला तिचा प्रवास आता बॉलीवूड आणि दाक्षिणात्य सिनेमांमध्ये जोमाने सुरू आहे. अभिनयाबरोबरच तिच्या ग्लॅमरस आणि स्टायलिश फोटोंमुळे ती सोशल मीडियावर सतत चर्चेत असते, त्यामुळे ती अनेक तरुणांची क्रश आहे. नुकतीच तिने सध्या ट्रेंडिंग असलेल्या ‘तांबडी चामडी’ (Taambdi Chaamdi Song) या मराठी गाण्यावर इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केली. तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.
मृणाल सध्या तिच्या नव्या कलाकृतीचं शूटिंग करत आहे. हे शूटिंग संपवून तिने ‘तांबडी चामडी’ गाण्यावर एक छोटी रील इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केली होती. या स्टोरीमध्ये मृणालच्या आजूबाजूला ‘तांबडी चामडी’ गाणं सुरू नाही, किंवा ती त्यावर डान्स करतानाही दिसत नाही. मात्र, तिने स्वतःच हे गाणं म्हटलं आहे. डीजे क्रेटेक्स आणि श्रेयस सागवेकर यांनी हे गाणं तयार केलं आहे आणि त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर मृणालची रील शेअर केली आहे.
रीलमध्ये मृणाल शूटिंग संपवून गाडीत बसलेली दिसते. पॅकअप झाल्यावर तांबडी चामडी चमकते उन्हात लक लक लक!” असं म्हणत मृणाल मोबाईल हलवते. शूटिंग संपल्यावर ती आनंदी असल्याने हे गाणं म्हणून दाखवते. तिच्या बाजूला बसलेली व्यक्ती मृणालचा उत्साह बघून “अरे थांबा थांबा” असं म्हणत हसते. नंतर या व्हिडीओत मृणाल थोडीशी हताश होऊन म्हणते, “मला खूप गोष्टी करायच्या आहेत, पण मी त्या करू शकत नाही.” हे वाक्य संपल्याबरोबरच ती पुन्हा “लका लका लका” असं गाणं म्हणत एका हाताचं बोट वर करून बसल्या जागीच नाचते. तिने ही रील पोस्ट करत “थांबा २४ तासही कमी आहेत!” अस कॅप्शन दिलं आहे. मृणाल दिवसभर शूटिंग करूनही रात्री खूप उत्साही असल्याचं या स्टोरीवरून स्पष्ट होतं. स्टोरीच्या शेवटी ती सर्वांना “गुड नाईट” म्हणते.
मृणाल का झाली हताश?
मृणालने ‘तांबडी चामडी’ गाण्यावर पोस्ट केलेल्या स्टोरीमध्ये ती दिवसभर काम करून उत्साही जरी दिसत असली तरी थोडीशी हताश होते. तिला अनेक गोष्टी करायच्या आहेत, पण ती त्या करू शकत नाही असं म्हणते. यामागे कदाचित तिने गणेश चतुर्थीच्या दिवशीही काम करत असल्याचं कारण असू शकतं. असा अंदाज लावला जात आहे. मृणालने गणेश चतुर्थीच्या दिवशी एक स्टोरी पोस्ट केली होती, ज्यात तिने लिहिलं होतं, “मी गणेश चतुर्थीच्या दिवशी काम करत आहे. मला फोमो (Fear of Missing Out) होत आहे. माझ्या वाटचा एक जास्तीचा मोदक तुम्ही खा,” असं कॅप्शन देऊन तिने चाहत्यांना आवाहन केलं होतं. याच स्टोरीबरोबर मृणालने ड्रेसिंग टेबल, आरसा आणि त्यासमोर असलेली खुर्ची याचा फोटो देखील शेअर केला होता.

शेवटी मृणालने मोदक खाल्ला
मृणालने शनिवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी ती गणपती असतानाही काम करत असल्याची स्टोरी पोस्ट केली होती. रविवारी तिने ‘तांबडी चामडी’ गाण्याची स्टोरी पोस्ट करत तिला अनेक गोष्टी करता येत नसल्याचं सांगितलं. मात्र, सोमवारी तिने शेवटी तिचा आवडता मोदक खाल्ला असून, त्याबरोबर तिने अशी स्टोरी पोस्ट केली आहे की, “मोदक एकटा कोपऱ्यात बसून रडत होता, त्यामुळे मी तो खाल्ला,” अशा आशयाचं कॅप्शन तिने दिलं होतं.

हेही वाचा…Video: दीपिका पादुकोण-रणवीर सिंग झाले आई-बाबा, मुकेश अंबानींनी दोघांची रुग्णालयात घेतली भेट
दरम्यान, मृणालने नुकताच ‘कल्की २८९८ एडी’ मध्ये कॅमिओ केला होता. येत्या काळात तिचे ‘सन ऑफ सरदार २’ आणि ‘पूजा मेरी जान’ हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.