Mrunal Thakur : अभिनेत्री मृणाल ठाकूर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती चित्रपटाच्या सेटवरील, व्हॅनिटी व्हॅनमधील अनेक हलकेफुलके क्षण सोशल मीडियावर पोस्ट करत असते. मृणाल अनेकदा रिल्स, आणि इन्स्टाग्राम व्हिडीओज मराठीत तयार करते. या वर्षी गणपतीमध्ये तिने ‘तांबडी चांबडी’ मराठी या गाण्यावर व्हिडीओ तयार केला होता. मृणाल अनेकदा मराठीत बोलताना सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करते.
अलीकडेच मृणालने इन्स्टाग्रामवर ‘यू हॅव गॉट क्वेशन्स, आय हॅव गॉट आन्सर्स’ (तुमचे प्रश्न माझी उत्तरे) / (आस्क मी अॅनीथिंग) हे सेशन घेतले होते. त्यात तिला एका चाहत्याने ती मराठी आहे का हा प्रश्न विचारला होता. हे सांगताना मृणालने तिच्या सहकाऱ्यांसह ती मराठी आहे हे दाखवण्यासाठी एक गाणे म्हणून दाखवले.
हेही वाचा…“जगातील माझ्या सर्वात…”, सलमान खानच्या वडिलांसाठी लुलिया वंतूरची पोस्ट; म्हणाली, “त्यांनी मला…”
मृणालच्या चाहत्याने ती मराठी आहे का हे विचारल्यावर मृणाल व्हिडीओ तयार करत म्हणाली आपण मराठी आहोत का ? हे आपल्या चाहत्याला कसे कळेल ? मृणालने हा व्हिडीओ शूट केला असल्यामुळे ती या व्हिडीओत दिसत नसली तरी ती कॅमेरामागून व्हिडीओत बोलते. या व्हिडीओत मृणालची बहीण लोचन ठाकूर आणि तिच्या अन्य दोन महिला सहकारी दिसत आहेत. मृणाल जेव्हा तुम्ही मराठी आहेत हे कसे सांगाल हे विचारल्यावर व्हिडीओत दिसणारी मृणालची सहकारी ‘जय महाराष्ट्र’ असे म्हणते. तेव्हा मृणाल त्यांना आपण मराठी आहोत हे सिद्ध करण्यासाठी एक मराठी गाणे गा असे सुचवते. मृणालच त्यांना ‘सांग सांग भोलानाथ’ हे मराठी गाणे गा असे सुचवते.
या व्हिडीओत मृणाल दिसत नसली तरी ती स्वतः गाणे म्हणते, मृणालची बहीण लोचन सुद्धा हे गाणे म्हणताना दिसते. तर मृणालची एक सहकारी या गाण्यावर बसल्या जागी नाचत गाणे म्हणते. गाण्यात शेवटी पाऊस पडेल काय हे वाक्य आल्यावर मृणालची बहीण म्हणते पाऊसाच जाऊद्या पॅकअप कधी होईल ते सांगा. हे म्हंटल्यावर हशा पिकतो.
पाहा व्हिडीओ –
हेही वाचा…‘मंजुम्मेल बॉईज’ फेम अभिनेत्याला मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्यामुळे झाली अटक, पोलीस म्हणाले…
मृणालने दाखवली ‘सन ऑफ सरदार २’ ची झलक
मृणालच्या एका चाहत्याने तिला इन्स्टा स्टोरीवर तू ‘सन ऑफ सरदार २’ मध्ये आहेस तर मला पंजाबी मध्ये डायलॉग बोलून दाखव अशी इच्छा व्यक्त केली. त्यांनतर तिने ‘जडे मेनू प्यार कर दे ने पसंद कर देने’ हा डायलॉग बोलून दाखवला.
© IE Online Media Services (P) Ltd