‘मुघल-ए-आझम’ची गणना बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वात अजरामर चित्रपटांमध्ये केली जाते. हा चित्रपट बनवण्यासाठी तब्बल १७ वर्षे लागली होती. हा चित्रपट बनवणं हे दिग्दर्शक के. आसिफ यांची जिद्द होती. या चित्रपटाची जेवढी चर्चा झाली, तेवढंच दिग्दर्शक के. आसिफ यांचं वैयक्तिक आयुष्यही फिल्मी होतं. खरं तर के. आसिफ यांनी त्यांच्या करिअरमध्ये फक्त दोन चित्रपट बनवले, त्यातला ‘मुघल-ए-आझम’ एक होता आणि दुसरा चित्रपट ‘फूल’ होता.
या फोटोत आहेत सतीश कौशिक अन् त्यांचे दोन जवळचे मित्र; तुम्ही ‘या’ कलाकारांना ओळखलंत का?
आसिफ यांनी ४ लग्नं केली होती. आसिफ हे बॉलिवूड सुपरस्टार दिलीप कुमार यांचे भावोजी होते. आसिफ यांची पत्नी दिलीप कुमार यांची बहीण होती. के. आसिफ यांचे आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नव्हते. आसिफ यांना त्यांच्या पहिल्या पत्नीने शाप देऊन घर सोडले होते. के आसिफ यांनी जे दोन चित्रपट बनवले, त्यापैकी ‘मुघल-ए-आझम’ बनवण्यासाठी खूप वर्षे घालवली. त्या काळी चित्रपटाच्या एका गाण्यासाठी त्यांनी १० लाख रुपये खर्च केले होते.
Video: गोष्ट पडद्यामागची: अनुराग कश्यपच्या ‘गँग्स ऑफ वासेपूर’ गावाची खरी गोष्ट काय?
इटावा येथे १४ जून १९२२ रोजी जन्मलेल्या आसिफ यांचे बालपण गरिबीत गेले. त्यांना केवळ आठवीपर्यंतच शिक्षण घेता आले. यानंतर आसिफ मुंबईत आले. आसिफ एक हुशार चित्रपट निर्माते होते. ते त्यांच्या चित्रपटांइतकेच चार लग्नांमुळेही चर्चेत राहिले. आसिफ आपल्या मामीच्या प्रेमातही पडले होते, असं म्हटलं जातं.