अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा प्री-वेडिंग सोहळा १ मार्च ते ३ मार्च दरम्यान जामनगरमध्ये पार पडला. सध्या भारतातच नव्हे, तर जगभरात या सोहळ्याची चर्चा सुरू आहे. अमेरिकेचे पूर्व राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी, फेसबुक इंस्टाग्रामचा कर्ताधर्ता मार्क झुकरबर्गपासून कित्येक बड्याबड्या लोकांनी या सोहळ्याला हजेरी लावली. उद्योगपति, राजकरणी नेते मंडळी यांच्यापासून कित्येक हॉलिवूड सेलिब्रिटीजही या लग्नाला उपस्थित होते. प्रसिद्ध पॉपस्टार रिहाना हिनेदेखील या लग्नात खास परफॉर्म केलं, भारतातील रिहानाचा हा पहिला इव्हेंट होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या सेलिब्रिटीजबरोबरच संपूर्ण बॉलिवूडने या सोहळ्याला हजेरी लावली होती. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत ते बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांनी देखील या सोहळ्याला हजेरी लावली होती. याच प्री वेडिंग सोहळ्यातील एका व्हिडीओची प्रचंड चर्चा होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये मुकेश अंबानी आणि नीता अंबानी हे त्यांचा मुलगा अनंत अंबानीच्या ‘गॉडफादर’विषयी बोलताना दिसत आहेत.

आणखी वाचा : “मी स्वतःला नास्तिक…”, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबद्दल अनुराग कश्यप स्पष्टच बोलला

आपल्या मुलाच्या या प्री-वेडिंग सोहळ्यात मुकेश आणि नीता अंबानी यांनी सगळ्या पाहुण्यांचे आदरातिथ्य उत्तमरीत्या केले. इतकंच नव्हे तर या सोहळ्यातील एक व्हिडीओ क्लिप व्हायरल होत आहे ज्यात मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान हा आपल्या मुलाचा म्हणजेच अनंत अंबानीचा गॉडफादर आहे असे जाहीर केले. त्यावेळी शाहरुखला मंचावर आमंत्रित करताना मुकेश अंबानी यांनी अनंत अंबानीचा ‘गॉडफादर’ असं म्हणत शाहरुख खानचे स्वागत केले.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अनंत लहान असल्यापासूनच शाहरुख खान हा त्याचा गॉडफादर होता असाही खुलासा मुकेश आणि नीता अंबानी यांनी केला. लहानपणापासूनच अनंत शाहरुखला आपला सर्वेसर्वा मानतो. मीडिया रीपोर्टनुसार अनंत व राधिकाच्या प्री वेडिंगचा सोहळा हा आणखी काही दिवस असाच सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.