शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट ७ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये दाखल झाला. शाहरुख खानच्या जवान या चित्रपटाचे गेले अनेक महिने सर्वत्र प्रचंड चर्चा होती. तर आता या चित्रपटाला सर्वत्र खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाचे सगळे शो हाऊसफुल होत आहेत. अशातच या चित्रपटातील एका कलाकाराने त्याला या चित्रपटात काम करायचं नव्हतं असं म्हटलं आहे.
‘जवान’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. या चित्रपटातील कलाकारांची कामं, व्हीएफएक्स, गाणी, ॲक्शन हे सगळंच प्रेक्षकांना फार आवडला आहे. या चित्रपटात कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. पण या चित्रपटात काम करण्यासाठी शाहरुख आणि ॲटली त्यांच्यावर जबरदस्ती केली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
आणखी वाचा : Jawan OTT release: किंग खानचा ‘जवान’ कधीपासून घरबसल्या पाहता येणार? घ्या जाणून
या चित्रपटात मुकेश छाब्रा आरोग्य मंत्र्यांच्या पीएच्या भूमिकेत दिसत आहेत. या भूमिकेबद्दल ते म्हणाले, “मला थोडीच अभिनयात करिअर करायचा आहे. या चित्रपटातही काम करायला मी नाहीच म्हणत होतो पण शाहरुख आणि ॲटली यांनी माझ्यावर जबरदस्ती केली आणि मला या भूमिकेसाठी तयार केलं. ते दोघ मला म्हणाले की तुम्ही भूमिका कर, तुला खरंच मजा येईल. शाहरुख आणि ॲटली यांच्या बोलण्यामुळेच मी ही भूमिका केली.”
पुढे ते म्हणाले, “मी शाहरुखचा चाहता आहे. त्यामुळे या चित्रपटात त्याच्या समोर त्याच्याबरोबर काम करायला मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आपल्या आवडत्या कलाकारावर बरोबर काम करण्याची मजा काही वेगळीच असते. मी या चित्रपटात काम करणं खरंच खूप एन्जॉय केलं.”