९०च्या दशकात छोट्या पडद्यावर बोलबाला असलेला शो म्हणजे ‘शक्तिमान’. लहानगेच नाही तर अगदी थोरा मोठ्यांना देखील या शोने भुरळ घातली होती. ९०च्या दशकातील ‘शक्तिमान’ या भारतीय सुपरहिरोने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. त्यानंतर यावर्षाच्या सुरुवातीलाच ‘शक्तिमान’ मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. या बिग बजेट सिनेमात रणवीर सिंह सुपुरहिरोच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यतादेखील वर्तवण्यात आली होती, पण आता मात्र खुद्द मुकेश खन्ना यांनी ही गोष्ट खोडून काढली आहे.

सुपरहिरो ‘शक्तिमान’च्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले मुकेश खन्ना यांनी रणवीर सिंगची ही भूमिका साकारण्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. मुकेश यांनी सोशल मीडियावर या कास्टिंगला आपला तीव्र विरोध असल्याचा खुलासा केला आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी रणवीर सिंगच्या नुकत्याच केलेल्या न्यूड फोटोशूटवरही टीका केली आणि रणवीरच्या व्यक्तीमत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

आणखी वाचा : “मी माझं घर विकून…”, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाबद्दल रणदीप हुड्डाचं मोठं वक्तव्य

आपल्या यूट्यूब व्हिडीओमध्ये मुकेश खन्ना यांनी रणवीरला त्याच्या नग्न फोटोशूटवरुन टोमणा मारत दुसऱ्या देशात काम शोधण्याचा सल्लाही दिला. ते म्हणाले, “तू कृपा करून दुसऱ्या देशात जाऊन काम शोध, फीनलँड स्पेनसारख्या देशात बरेच न्यूडिस्ट कॅम्प असतात तिथे जाऊन काम कर, अशा चित्रपटात जाऊन काम कर जिथे दर तिसऱ्या सीनला तुला न्यूड व्हायची संधी मिळेल.”

पुढे मुकेश खन्ना म्हणाले, “संपूर्ण शरीर दाखवून जर तो स्वतःला आमच्यापेक्षा स्मार्ट समजत असेल तर तो त्याचा भ्रम आहे. सर्वात शक्तिमान हा फक्त आणि फक्त परमेश्वर आहे. मी निर्मात्यांना बोललो आहे की तुमची स्पर्धा बॅटमॅन, स्पायडर मॅन यांच्याशी नाहीये. शक्तिमान हा फक्त सुपरहीरो नाहीये, तो एक सुपर शिक्षकपण आहे ज्याचं लोक ऐकतील. जर माझ्या डोक्यात या भूमिकेसाठी कुणी योग्य कलाकार असता तर मी आत्तापर्यंत या चित्रपटावर काम सुरू केलं असतं.”

मुकेश खन्ना या चित्रपटाच्या कास्टिंगबद्दल म्हणाले, “शक्तिमानसाठी फिजिकल कास्टिंग हे फार महत्त्वाचं आहे. याबरोबरच मी हेदेखील बऱ्याचदा म्हणालो आहे की, हा चित्रपट फक्त कंटेंटच्या बळावरच चालेल, कोणत्याही सुपरस्टारच्या जीवावर हा चित्रपट चालणार नाही.” गेल्याच महिन्यांत ‘शक्तिमान’चं चित्रीकरण सुरू झालं असून रणवीर सिंग त्यात प्रमुख भूमिकेत असल्याचं वृत्त समोर आलं होतं. आता मुकेश खन्ना यांच्या या वक्तव्यामुळे रणवीर सिंग नेमका या चित्रपटात झळकणार की नाही यावर प्रश्नचिन्ह पुन्हा निर्माण झालं आहे.

Story img Loader