ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना, यांना शक्तिमान आणि दूरदर्शनवरील ‘महाभारत’ या मालिकांसाठी ओळखले जाते. ‘महाभारत’ मालिकेत त्यांनी ‘भीष्म पितामह’ ही भूमिका साकारली होती. त्यांनी नुकतेच ‘द कपिल शर्मा शो’वर न जाण्याचे कारण स्पष्ट केले आहे. मुकेश खन्ना यांनी सांगितले की त्यांना या शोच्या निर्मात्यांकडून कधीही संपर्क करण्यात आला नाही. पण जरी संपर्क करण्यात आला असता तरीही त्यांनी या शोमध्ये जाण्यास नकार दिला असता.

सिद्धार्थ कन्ननच्या पॉडकास्टमध्ये बोलताना मुकेश खन्ना म्हणाले, “मला माहित नाही की कपिल शर्माची समस्या काय होती, पण त्याने कधीच माझ्याशी संपर्क केला नाही. कदाचित त्याचा अहंकार मध्ये आडवा येत असेल.”

हेही वाचा…“अमित शाह देशाचे हनुमान”, वरुण धवनने गृहमंत्र्यांचं केलं कौतुक अन् विचारला प्रश्न; म्हणाला, “राम आणि रावण…”

मुकेश खन्ना यांनी याच पॉडकास्टमध्ये ते कपिल शर्मा शोमध्ये का जाणार नाहीत याचे कारण स्पष्ट केले. एकदा त्यांचे सहकलाकार गुफी पेंटल यांनी त्यांना सांगितले होते की रामायणची स्टारकास्ट कपिल शर्मा शोमध्ये जाणार आहे, त्यामुळे महाभारतच्या टीमला देखील शोमध्ये बोलावले जाईल. मात्र, मुकेश खन्ना यांना आधीच कपिल शर्मा शोमधील काही विनोदांवर आक्षेप होता. त्यांना असे वाटले की हा शो ‘अश्लीलता’ आणि कमरेखालील विनोदांवर” जास्त भर देतो. पेंटल यांना उत्तर देताना खन्ना म्हणाले, “लोक या शो मधील विनोदांवर हसतात, पण मला त्या विनोदांमध्ये कोणतीही शालीनता दिसत नाही.”

मुकेश खन्ना यांनी या पॉडकास्टमध्ये सांगितले की कपिल शर्मा शोच्या एका प्रोमोमुळे त्यांनी या शोमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला. ते म्हणाले, “मी संपूर्ण एपिसोडसुद्धा पाहिला नाही, फक्त प्रोमो पाहिला. त्या प्रोमोमध्ये ‘रामायण’ मालिकेत ज्यांनी प्रभू रामाची भूमिका साकारली होती ते अभिनेते अरुण गोविल दिसतात. आणि कपिल शर्मा त्यांना विचित्र प्रश्न विचारत आहेत असं दिसतं. कपिलने त्यांना विचारलं होतं की, ‘अरुणजी, तुम्ही स्नान करताय, आणि लोक म्हणतायत, रामसुद्धा व्हीआयपी अंडरवेअर घालतो.’ अरुण गोविल फक्त हसले आणि गप्प बसले. पण मी असतो, तर मी माझी नाराजी त्याला बोलून दाखवली असती. तुम्ही अशा प्रतिष्ठित व्यक्तीला असा फालतू प्रश्न कसा विचारता असं विचारलं असतं?”

हेही वाचा…अल्लू अर्जुनला तुरुंगात देण्यात आले होते ‘हे’ अन्नपदार्थ, पुरवण्यात आल्या होत्या ‘या’ सुविधा; वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली माहिती

मुकेश खन्ना यांनी कपिल शर्मा शोच्या विनोद शैलीवर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “मला त्या शोमध्ये अश्लीलता दिसते. मला दुहेरी अर्थ असलेल्या संवादांचे, एका मर्यादेपलीकडील विनोदांचे प्रमाण जास्त दिसते. लोक त्यावर हसतात, पण मला त्यात कोणतीही शालीनता दिसत नाही,” असे मुकेश खन्ना यांनी नमूद केले.

एका प्रसंगाचा उल्लेख करताना मुकेश खन्ना म्हणाले की एकदा एका पुरस्कार सोहळ्यात कपिल शर्माने त्यांना पूर्णपणे दुर्लक्षित केले होते. “माझी कपिलशी पहिली भेट एका पुरस्कार सोहळ्यात झाली होती. मी तिथे सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार जिंकला होता. कपिल माझ्या शेजारी बसला होता, पण त्याने मला ‘हॅलो’ देखील म्हणण्याची तसदी घेतली नाही. आमच्या इंडस्ट्रीत, जरी तुम्ही एकत्र काम केले नसेल तरी, ‘कसे आहात सर?’ असे आपण विचारतोच.”

हेही वाचा…ना ‘मिर्झापूर’ ना ‘पंचायत’…; जगभरातील लोकांनी Google वर ‘या’ भारतीय वेब सीरिजला सर्वाधिक केलं सर्च

अभिनेते मुकेश खन्ना यांनी अलीकडेच लोकप्रिय ‘शक्तिमान’ मालिकेवर सिनेमा येणार अशी घोषणा केली होती. या सिनेमात तेच काम करणार असल्याचे प्रेक्षकांना समजल्यावर काहींनी याचे स्वागत केले तर काही लोकांनी त्यांना ट्रोल केले होते.

Story img Loader