बॉलिवूड किंग शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्यावरुन निर्माण झालेला वाद अजूनही सुरुच आहे. दीपिका पदुकोणने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केल्यामुळे या गाण्यावर आक्षेप घेतला जात आहे.
दिग्गज अभिनेते मुकेश खन्ना यांनी ‘बेशरम रंग’ गाण्याला अश्लील म्हटलं होतं. “भगवा रंग एका धर्मासाठी किती महत्त्वाचा आहे हे गाणं बनवणाऱ्याला माहित नाही का? आपला देश काही स्पेन नाही जिथे अशाप्रकारची गाणी प्रदर्शित होतील. आता अर्धे कपडे परिधान करुन गाणी प्रदर्शित केली जात आहेत. काही काळानंतर कपडे परिधान न करताच गाणी तयार करण्यात येतील”, असं ते म्हणाले होते. आता पुन्हा त्यांनी या गाण्यावर आक्षेप घेतला आहे.
मुकेश खन्ना यांनी त्यांच्या युट्यूब चॅनेलवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी ‘पीके’, ‘काली’, ‘लक्ष्मी’, ‘आदिपुरुष’ या चित्रपटांचे दाखले देत हिंदी सिनेमात देवतांचा अपमान केल्याचं म्हटलं आहे. “पठाण चित्रपटाने तर सगळ्याच सीमा पार केल्या आहेत. ‘बेशरम रंग’मध्ये अभिनेत्री भगव्या रंगाची बिकिनी परिधान करुन डान्स करत आहे. हे सगळं कॉन्ट्रोवर्सीसाठी केलं आहे का? वाद निर्माण झाल्यानंतर प्रसिद्धी मिळते. मग लोक चित्रपट पाहायला जातात. यातून हिंदू धर्माला टार्गेट केलं जात आहे. या चित्रपटाला बॉयकॉट करण्याला मी पाठिंबा देतो”, असं ते म्हणाले आहेत.
हेही वाचा>> ‘हर हर महादेव’ नंतर सुबोध भावे नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला, पोस्टर शेअर करत म्हणाला…
हेही पाहा>>
मुकेश खन्ना यांनी व्हिडीओतून सेन्सॉर बोर्डला सल्लाही दिला आहे. “जर सेन्सॉर बोर्डातील लोकांना हिंदू धर्माचं ज्ञान नसेल, तर त्यांना त्या पदावरुन दूर केलं पाहिजे. बेशरम रंग गाण्यातील दीपिकाचा भगव्या रंगाचा ड्रेस पूर्णत: बदलला पाहिजे. निर्मात्यांना नुकसान झाल्यानंतर ते परत कधीच हिंदू धर्माचा अपमान करण्याची हिंमत करणार नाहीत”, असं त्यांनी म्हटलं आहे.
शाहरुख खान व दीपिका पदुकोण मुख्या भूमिकेत असलेला ‘पठाण’ चित्रपट येत्या २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जॉन अब्राहमही महतत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.