अभिनेत्री सोनाक्षी सिन्हावर वडील शत्रुघ्न सिन्हा यांनी योग्य संस्कार केले नाहीत, असं वक्तव्य ‘शक्तिमान’ फेम मुकेश खन्ना यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर सोनाक्षी सिन्हा भडकली व तिने एक पोस्ट शेअर करून त्यांना उत्तर दिलं. तसेच शत्रुघ्न सिन्हा यांनीही प्रतिक्रिया देत खन्ना यांची पात्रता काढली. आता मुकेश खन्ना यांनी सोनाक्षीच्या पोस्टनंतर स्पष्टीकरण दिलं आहे.

सोनाक्षीचं नाव घेऊन फक्त एक उदाहरण देत होतो, असं खन्ना यांनी म्हटलं आहे. “मला आश्चर्य वाटतंय की सोनाक्षीने प्रतिक्रिया देण्यासाठी इतका वेळ घेतला. ‘कौन बनेगा करोडपती’ शोमधील त्या प्रसंगावरून मी तिचे नाव घेऊन फक्त एक उदाहरण देत होतो. तिची किंवा तिच्या वडिलांची बदनामी करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. तिचे वडील माझे वरिष्ठ आहेत व माझे त्यांच्याशी चांगले संबंध आहेत”, असं मुकेश खन्ना यांनी न्यूज9ला सांगितले.

Riteish Deshmukh Birthday Celebration
लाडक्या बाबासाठी खास Surprise! रितेश देशमुखच्या वाढदिवशी दोन्ही मुलांनी केली ‘ही’ खास गोष्ट, फोटो आला समोर
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Chhagan Bhujbal
नाराज भुजबळांची पदाधिकारी-कार्यकर्त्यांशी चर्चा, पुढची योजना ठरली? स्वतः माहिती देत म्हणाले…
Shatrughan Sinha slams Mukesh Khanna
“हिंदू धर्माचा रक्षक कोणी बनवलं?”, शत्रुघ्न सिन्हा यांनी ‘त्या’ वक्तव्यासाठी मुकेश खन्नांची पात्रता काढली; म्हणाले, “सोनाक्षी…”
Nana patole and uddhav thackeray
Leader of Opposion Party : विरोधी पक्षनेतेपदावरून काँग्रेस – शिवसेनेत दुफळी? नाना पटोले म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी स्वतंत्र…”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Amit Shah on Ambedkar
अमित शाह यांनी आंबेडकरांवर केलेली टिप्पणी वादात? काँग्रेसकडून टीका, माफी मागण्याची मागणी

हेही वाचा – “हिंदू धर्माचा रक्षक कोणी बनवलं?”, शत्रुघ्न सिन्हा यांनी ‘त्या’ वक्तव्यासाठी मुकेश खन्नांची पात्रता काढली; म्हणाले, “सोनाक्षी…”

मुकेश खन्ना पुढे म्हणाले, “आताची पिढी ज्यांना जेन-झी म्हटलं जातं, त्यांच्याबद्दल बोलायचा माझा हेतू होता. जेन-झी पिढी गुगल आणि मोबाईल फोनची गुलाम झाली आहे. त्याचे ज्ञान विकिपीडिया आणि युट्यूबवरील सोशल कॉन्टॅक्टपुरते मर्यादित झाले आहे. याबद्दल बोलताना माझ्यासमोर एक मोठं उदाहरण (सोनाक्षी सिन्हा) होतं, त्यामुळे मी इतरांना शिकवण्यासाठी ते वापरलं.”

हेही वाचा – मुकेश खन्ना यांचा शत्रुघ्न सिन्हांच्या संस्कारावर प्रश्न; भडकलेली सोनाक्षी सिन्हा म्हणाली, “यापुढे काही बोलाल…”

“आपल्या संस्कृतीत आणि इतिहासात बरेच ज्ञान आहे, जे आजच्या प्रत्येक तरुणाला माहीत असायला पाहिजे आणि त्याचा अभिमानही वाटायला पाहिजे. एवढंच”, असं मुकेश खन्ना म्हणाले. सोनाक्षीने २०१९ मध्ये ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये हजेरी लावली होती. शोमध्ये तिला ‘हनुमानाने संजीवनी बुटी कुणासाठी आणली होती?’ असा प्रश्न विचारला. त्याचे चार पर्याय सुग्रीव, लक्ष्मण, सीता आणि राम हे होते. सोनाक्षीला उत्तर आलं नाही, त्यामुळे तिने लाइफलाइन वापरली होती. यावरूनच मुकेश खन्ना यांनी तिच्यावर टीका करत ही तिची चूक नसून तिच्या वडिलांचे संस्कार कमी पडले असं म्हटलं होतं.

हेही वाचा – ॲटलीच्या दिसण्यावरून कमेंट करण्याबद्दल कपिल शर्माने दिलं उत्तर; म्हणाला, “मेंढरासारखे कोणाचेही…”

सोनाक्षी सिन्हाची पोस्ट

सोनाक्षीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये मुकेश खन्ना यांना उत्तर दिलं. “खूप वर्षांपूर्वी मी एका कार्यक्रमात रामायणसंदर्भातील प्रश्नाचं योग्य उत्तर देऊ शकले नाही, ही माझी नव्हे तर माझ्या वडिलांची चूक आहे, असं तुम्ही म्हणालात. मी तुम्हाला आठवण करून देते की त्या दिवशी हॉट सीटवर दोन महिला होता, ज्यांना त्याच प्रश्नाचं उत्तर माहीत नव्हते, पण तुम्ही फक्त माझे नाव घेता, त्याचं कारणही स्पष्ट आहे,” असं सोनाक्षी म्हणाली.

“यापुढे तुम्ही माझ्या वडिलांनी माझ्यावर केलेल्या संस्कारांबद्दल काहीही बोलाल तेव्हा लक्षात ठेवा की तुम्ही माझ्या संगोपनाबद्दल असं घाणेरडं वक्तव्य केलं, तरीही त्यांच्याच संस्कारांमुळे मी आज जे बोलले ते आदराने बोलले आहे”, अशा शब्दांत सोनाक्षीने मुकेश खन्नांना उत्तर दिलं.

Story img Loader