१९९० च्या दशकात टीव्हीवर दाखवली जाणारी शक्तिमान ही मालिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. या मालिकेत मुकेश खन्ना यांनी पहिला भारतीय सुपरहिरो ‘शक्तिमान’ साकारला होता. आजही प्रेक्षक त्यांना शक्तिमान म्हणूनच ओळखतात. शक्तिमान मालिका बंद झाल्यानंतर बऱ्याच वर्षांनी यावर सिनेमा येणार अशी बातमी आली होती, ज्यात रणवीर सिंह शक्तिमानची भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, मुकेश खन्ना यांनी या वृत्ताच खंडन करत रणवीर सिंहवर टीका केली.

रणवीर सिंह योग्य निवड नाही – मुकेश खन्ना

शक्तिमानच्या भूमिकेसाठी रणवीर सिंहची निवड झाल्याच्या अफवांनंतर, मुकेश खन्ना यांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, रणवीर सिंह, अक्षय कुमार किंवा आमिर खान यांसारख्या आजच्या पिढीतील कोणत्याही अभिनेत्यांमध्ये शक्तिमान साकारण्यासाठी आवश्यक असणार निरागसपण आणि प्रामाणिकपण नाही.

Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Marathi actor Kushal Badrike funny post and share photos with wife
“आमचा संसार चालत नाही, तो…”, कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण
Vivek Oberoi was last seen in Rohit Shetty's Indian Police Force. (Photo: Vivek Oberoi/ Instagram)
Vivek Oberoi : विवेक ओबेरॉयने सांगितलेला अनुभव चर्चेत, “पांढऱ्या दाढीतील तो रहस्यमयी माणूस त्याने मला सांगितलं की…”

हेही वाचा…Video : शाहरुख खान आणि विकी कौशलचा ‘ऊ अंटावा’ गाण्यावर डान्स; समांथा रुथ प्रभू व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “मी स्वप्नातही…”

“रणवीरने शक्तिमानची भूमिका मिळवण्यासाठी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला”

‘बॉलीवूड ठिकाणा’ला दिलेल्या मुलाखतीत मुकेश खन्ना यांनी सांगितलं, “सर्वांना माहित आहे की रणवीर सिंहने त्याला शक्तिमानची भूमिका साकारण्याची संधी मिळावी यासाठी त्याने माझी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. हे खर आहे की मी रणवीरचं त्याच्या अभिनयासाठी कौतुक केलं आणि त्याला प्रतिभावान अभिनेता म्हटलं. मात्र, मी रणवीरला शक्तिमान म्हणून मान्यता दिलेली नव्हती. मी याबाबत एक व्हिडीओसुद्धा अपलोड केला होता ज्यामध्ये मी स्पष्ट केलं की रणवीरला या भूमिकेसाठी मी निवडलं नाही.”

मुकेश खन्ना पुढे सांगतात, “रणवीर माझ्यासमोर तीन तास बसला होता, परंतु शेवटी मला त्याला सांगावं लागलं की या भूमिकेसाठी आवश्यक असलेल्या भावनाच त्याच्या चेहऱ्यावर दिसत नाहीत.”

हेही वाचा…Video : ‘ॲनिमल’साठी सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कार मिळाला अन् बॉबी देओलने पत्नीला केलं किस, व्हिडीओ व्हायरल

रणवीर सिंहच्या गंभीर भूमिकांबद्दल प्रशंसा

मुकेश खन्ना यांना रणवीरने गंभीर भूमिका चांगल्या प्रकारे केल्या आहेत यावर तुमच मत काय अस विचारले असता त्यांनी याबाबतीत रणवीरच्या कौशल्याचं आणि त्याच्या कामगिरीचं कौतुक केलं. मात्र, त्यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितलं की रणवीर शक्तिमानच्या भूमिकेसाठी योग्य निवड नाही. “सिनेक्षेत्रात निर्माता कलाकाराची निवड करतो, त्याउलट कधीच होत नाही,” असंही मुकेश खन्ना म्हणाले.

हेही वाचा…Video : दिलजीत दोसांझने पाकिस्तानी चाहतीला लाइव्ह कॉन्सर्टमध्ये दिली भेटवस्तू; म्हणाला, “या सीमा राजकारण्यांनी…”

रणवीर सिंहच्या वादग्रस्त फोटोशूटवर टीका

रणवीर सिंहच्या वादग्रस्त न्यूड फोटोशूटबद्दल मुकेश खन्ना यांनी आपल्या नाराजीचा पुनरुच्चार केला. त्यांनी सांगितलं, “त्या फोटोशूटपासूनच माझा रणवीरकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. त्यांनी रणवीरच्या नग्न फोटोशूटसाठी त्याच्यावर टीका केली होती आणि त्याला सल्ला दिला होता की, ज्या देशात नग्नता ही कॉमन आहे त्या देशात रणवीरने जाऊन अशा भूमिका कराव्यात.”

Story img Loader