ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांनी नुकतीच ‘शक्तीमान’च्या पोशाखात एक पत्रकार परिषद घेतली. आता त्यांनी पत्रकार परिषदेतील काही वक्तव्यांबद्दल एक्सवर पोस्ट करून स्पष्टीकरण दिले आहे. पुढचा ‘शक्तीमान’ कोण होईल हे आपल्याला माहीत नसल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच पत्रकार परिषद घेऊन रणवीर सिंगचा अपमान करण्याचा हेतू नव्हता, असंही त्यानी म्हटलंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पत्रकार परिषदेत मुकेश खन्ना यांना विचारण्यात आलं की त्यांनी रणवीरला त्यांच्या ऑफिसमध्ये काही तास थांबवून वाट पाहायला लावली, हे खरं आहे का? यावर ते म्हणाले, “नाही. मी त्याला थांबायला भाग पाडलं नाही. त्याला थांबायचं होतं म्हणून तो तीन तास बसला. तो माझ्या ऑफिसमध्ये आला, आम्ही एकमेकांची कंपनी एंजॉय केली. तो एक उत्कृष्ट अभिनेता आहे. पण शक्तीमानची भूमिका कोणी करायची, हे मी ठरवतो. निर्माते अभिनेत्यांना घेतात, अभिनेता निर्मात्याला घेऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये येऊन म्हणाला की तुम्हाला शक्तीमान व्हायचं आहे, तर तशी परवानगी नाही.”

हेही वाचा – भारतीय गायकाचे दिलदार पाकिस्तानी चाहते, भर मंचावर दिल्या ‘इतक्या’ कोटींच्या भेटवस्तू, व्हिडीओ व्हायरल

अक्षय कुमारला लगावला टोला

रणवीर सिंग अजूनही ही भूमिका साकारण्यासाठी आतुर आहे, असं मुकेश खन्ना यांनी सांगितलं. “तुम्हाला वाटत असेल की शक्तीमानची भूमिका करायला मोठ्या कलाकाराची गरज आहे, पण तसं नाही. शक्तीमानची भूमिका करण्यासाठी खास चेहरा असणं आवश्यक आहे. मला सांगा, अक्षय कुमार पृथ्वीराज चौहानच्या भूमिकेत चांगला का नाही वाटला? कारण त्याने विग आणि बनावट मिशा लावल्या होत्या,” असं मुकेश खन्ना म्हणाले.

हेही वाचा – ८ वर्षांचं प्रेम, कुटुंबियांचा विरोध अन्…; ‘ही’ लोकप्रिय मुस्लीम अभिनेत्री ‘या’ दिवशी करणार आंतरधर्मीय लग्न

मुकेश खन्ना यांनी दिलं स्पष्टीकरण

पोस्टमध्ये खन्ना यांनी त्यांच्या काही वक्तव्यांबद्दल स्पष्टीकरण दिले. “मी एक गैरसमज दूर करण्यासाठी आलोय. गाणं आणि पत्रकार परिषदेद्वारे मी पुढील शक्तीमान आहे याची घोषणा करण्यासाठी आलो होतो, असं म्हटलं जात आहे. पण हे सगळं खरं नाही,” असं ते म्हणाले. आपण पुढील शक्तीमान नसणार असं त्यांनी स्पष्ट केलं.

मुकेश खन्ना यांची पोस्ट

ते पुढे म्हणाले, “सर्वात आधी तर मी पुढचा शक्तीमान असेन, असं मी का म्हणू? मी आधीच शक्तीमान आहे. एक शक्तीमान असेल तेव्हाच दुसरा शक्तीमान असेल. आणि मी तो शक्तीमान आहे. माझ्याशिवाय दुसरा शक्तिमान होऊच शकत नाही. शक्तीमान म्हणून मला शक्तीमानचा वारसा तयार करायचा आहे. दुसरं म्हणजे मी रणवीर सिंह किंवा शक्तीमानचा पोशाख घालणाऱ्या इतर कोणापेक्षाही चांगला आहे, हे सिद्ध करण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी आलो नाही.”

हेही वाचा – “माझे ख्रिश्चन वडील ६ वेळा वैष्णोदेवीला गेले, तर मुस्लीम भाऊ…”; बॉलीवूड अभिनेत्याचा कुटुंबाबत खुलासा

तरुणांना संदेश द्यायचा होता, त्यामुळे शक्तीमानसारखा पोशाख घातला होता, असं मुकेश खन्ना यांनी सांगितलं. “नवीन शक्तीमान येईल. पण तो कोण असेल, हे मी सांगू शकत नाही. कारण मलाही माहीत नाही. शोध अजूनही सुरू आहे,” असं ते म्हणाले.

‘शक्तीमान’ हा टीव्ही शो १९९७ ते २००५ या काळात प्रसारित झाला होता. सोनी पिक्चर्स इंडियाने २०२२ मध्ये ‘शक्तीमान’ चित्रपटाची घोषणा केली. घोषणेपासूनच रणवीर सिंह यात मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mukesh khanna says ranveer singh not allowed to walk into my office and say he wants to be shaktimaan hrc