सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल यांचा विवाहसोहळा २३ जून रोजी नोंदणी पद्धतीने पार पडला होता. दोघांच्या रिसेप्शन पार्टीला अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी उपस्थित होते. सोनाक्षी आणि झहीरचं आंतरधर्मीय लग्न असल्यामुळे अभिनेत्रीला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. यामुळे या नवविवाहित जोडप्याने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरच्या कमेंट्स देखील बंद केल्या आहेत. काही लोकांना सोनाक्षीच्या लग्नाला लव्ह जिहाद देखील म्हटलं आहे. याप्रकरणी आता ‘शक्तिमान’ फेम अभिनेते मुकेश खन्ना यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मुकेश खन्ना यांनी ‘शक्तिमान’ आणि बीआर चोप्रांच्या ‘महाभारत’मध्ये भीष्म पितामह यांची भूमिका साकारली होती. अलीकडेच फिल्मी चर्चाला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्यांनी सोनाक्षी व झहीर यांच्या लग्नाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. सोनाक्षी व झहीर यांच्या लग्नाकडे हिंदू-मुस्लीम या दृष्टीकोनातून पाहू नका. सोनाक्षीने घेतलेला निर्णय हा अचानक घेतला नव्हता. लग्न करण्याआधी जवळपास ६ ते ७ वर्षं ते एकत्र राहत होते. असं ते म्हणाले.

Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
religious reform in india social transformation in religion hindu religious reform
पातक, प्रायश्चित्त आणि शुद्धीविचार
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
Maha Kumbh Mela World largest gathering begins in India
दीड कोटी भाविकांचे पवित्र स्नान; भक्तिमय वातावरणात महाकुंभाला सुरुवात
tarkteerth lakshmanshastri joshi expressed views on marriage age of girls
तर्कतीर्थ विचार : कन्या विवाह वय विचार
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
Devendra Fadnavis and Sharad Pawar (1)
Sharad Pawar : बीडप्रकरणी शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन; म्हणाले, “राजकारणात मतभेद असतील-नसतील, पण…”

हेही वाचा : ३.५ कोटीचं बॉक्स ऑफिस ओपनिंग देणारे कलाकार ३५ कोटी मागत आहेत! करण जोहरने मांडली वस्तुस्थिती

मुकेश खन्ना म्हणाले, “लव्ह जिहाद कशाला म्हणतात जेव्हा मुलीला लग्नासाठी जबरदस्ती केली जाते. हिंदू-मुस्लीम लग्न करू शकत नाहीत का? आमच्या काळातही अनेकांची अशीच लग्नं झाली होती आणि ते सगळे लोक खूप आनंदी आहेत. सोनाक्षी व झहीरचं लग्न ही त्यांच्या कुटुंबीयांसाठी अतिशय कौटुंबिक बाब आहे.”

सोनाक्षी व झहीरच्या लग्नाबाबत कुटुंबीय नाराज आहेत अशा चर्चा मध्यंतरी रंगल्या होत्या. यावेळी शत्रुघ्न सिन्हा यांनी खामोश म्हणत नकारात्मक प्रतिक्रिया देणाऱ्यांना गप्प केलं होतं. “या क्षणाची प्रत्येक मुलीचे वडील आतुरतेने वाट पाहत असतात. माझी मुलगी झहीरबरोबर सर्वाधिक आनंदी आहे त्यामुळे ते दोघंही कायम आनंदी आणि सुखात राहोत” असंही शत्रुघ्न सिन्हा म्हणाले होते.

हेही वाचा : Video : अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यातील परफॉर्न्ससाठी बादशाहने घेतलं ‘इतकं’ मानधन, बॉलीवूड सेलिब्रिटींसह पंड्याही थिरकला रॅपरच्या गाण्यांवर

दरम्यान, सोनाक्षी आणि झहीरसाठी २३ जून हा दिवस खूपच आहे. यामागचं कारण म्हणजे दोघांच्याही आयुष्यात या दिवसाला प्रचंड महत्त्व आहे. २०१७ मध्ये याच दिवशी ते एकत्र आले होते अन् त्यानंतर बरोबर सात वर्षांनी म्हणजेच २३ जून २०२४ रोजी हे जोडपं लग्नबंधनात अडकलं. अभिनेत्रीने लग्नात आईची साडी नेसून तिचेच दागिने घालून पारंपरिक लूक केला होता. तर रिसेप्शन पार्टीला लाल साडी, केसात गजरा, भांगेत कुंकू या लूकमध्ये सोनाक्षी खूपच सुंदर दिसत होती.

Story img Loader