चित्रपटनिर्माते सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट वादात सापडला आहे. केरळमधील ३२ हजार हिंदू आणि ख्रिश्चन महिलांनी इस्लाम धर्म स्वीकारला आणि नंतर त्यांना सीरियात नेऊन ‘आयएसआयएस’मध्ये भरती करण्यात आल्याचा दावा या चित्रपटात करण्यात आला आहे. चित्रपटातील या मुद्द्यावरून वादाला सुरुवात झाली आहे. या वादात आता आणखी भर पडली आहे. तामिळनाडूतील मल्टीप्लेक्स संघटनांनी चित्रपटगृहात हा चित्रपट न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- “भाई शंभर दोनशे रुपये जास्त घ्या पण…”; चाहत्याच्या ‘जवान’ चित्रपटाबाबतच्या ‘त्या’ मागणीवर शाहरुख खानची प्रतिक्रिया, म्हणाला..

कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती आणि चित्रपटाला मिळालेला कमी प्रतिसाद यामुळे तामिळनाडूतील मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांनी ‘द केरला स्टोरी’चे प्रदर्शन आजपासून बंद केले आहे. सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला बराच विरोध होत होता. त्याच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या अनेक याचिकाही कोर्टांमध्ये दाखल करण्यात आल्या होत्या. केरळ उच्च न्यायालयाने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार दिला.

हेही वाचा- “गुगलवर फक्त ‘हे’ दोन शब्द सर्च करा” ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाला प्रोपगंडा म्हणताच भडकली अदा शर्मा

‘द केरला स्टोरी’ चित्रपट ५ मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. गेल्या दोन दिवसांत बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने दमदार कामगिरी केली आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ७.५ कोटींचा व्यवसाय केला होता, तर दुसऱ्या दिवशी चित्रपटाने १२.५० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Multiplex theatres stop the kerala story film not to be screened in tamilnadu dpj
Show comments