नुकतंच मुंबईतील २६ वर्षीय कास्टिंग डायरेक्टर व फिल्म एडिटरला वर्सोवा पोलिसांनी त्याच्या १८ वर्षीय मैत्रिणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक केल्याचं वृत्त समोर आलं आहे. मुलीने आरोपीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने जबरदस्तीने तिचे डोके भिंतीवर आपटल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे.

त्या मुलीवर हल्ला केल्यानंतर ती मृत पावली असेल असे समजून त्या आरोपीने पळ काढला आणि गुजरातमधील सूरत या शहरात आसरा घेतला. दीपक मालाकर असे आरोपीचे नाव असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या कवटीत अनेक फ्रॅक्चर झाले असून सध्या तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून तिच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

आणखी वाचा : जेव्हा भर कार्यक्रमात अश्लील हावभाव करत शाहरुखने प्रियांका चोप्राला घातलेली लग्नासाठी मागणी अन्…

मलाकरने फेसबुकच्या माध्यमातून त्या तरुणीशी संपर्क साधला आणि गेल्या दोन महिन्यांपासून त्यांचे अफेअर सुरू होते. ही तरुणी बॉलिवूडमध्ये अभिनेत्री व्हायचे स्वप्न उराशी बाळगून मुंबईत आली होती. ११ ऑगस्ट रोजी मलाकर हा तरुणीला घेऊन वर्सोवा येथील मित्राच्या घरी गेला होता. तिथे त्याने तिच्यावर जबरदस्ती करायचा प्रयत्न केला ज्यामुळे त्यांच्यात भांडण झालं. मलाकरला राग अनावर झाला आणि त्याने त्या तरुणीचे डोके भिंतीवर आपटले ज्यामुळे ती बेशुद्ध झाली.

त्या मुलीला शुद्ध आल्यावर त्या घरातून ती कशीबशी बाहेर पडली. शेजारच्या लोकांनी तिला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. वर्सोवा पोलीस त्वरीत रुग्णालयात पोहोचले आणि मुलीच्या वक्तव्याच्या आधारे, आरोपी मलाकर याच्या विरोधात तातडीने एफआयआर नोंदवला. सध्या पोलिस त्याची कसून चौकशी करत आहेत.

Story img Loader