नुकतीच ‘मिसेस इंडिया वन इन अ मिलियन 2023’ ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत मॉडेल व अभिनेत्री रुपिका ग्रोव्हरने विजेतेपद पटकावलं आहे. वयाच्या ५५ व्या वर्षी रुपिकाने विवाहित महिलांची देशातील सर्वात मोठी स्पर्धा जिंकली आहे. ही स्पर्धा जिंकल्यानंतर रुपिकावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. रुपिका ही मुंबईची आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘मिसेस इंडिया वन इन अ मिलियन’ ही एक सौंदर्य स्पर्धा आहे. ही स्पर्धा देशातील फक्त विवाहित महिलांसाठी आहे. यामध्ये प्लॅटिनम, गोल्ड आणि क्लासिक सारख्या कॅटेगरी आहेत. स्पर्धेचा उद्देश फक्त एक विजेता शोधणं इतकाच नसून विवाहित महिलांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे.

पती नुपूर शिखरेपेक्षा तब्बल ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे आयरा खान; आमिर खानची लेक २६ वर्षांची, तर जावई…

‘मिसेस इंडिया वन इन अ मिलियन 2023′ स्पर्धेमध्ये विजय मिळवण्यासाठी रूपिकाने नृत्यदिग्दर्शक संदिप सोपारकर आणि फॅशन डायरेक्टर व पेजंट ट्रेनर कविता खरायत यांच्यासह अनुभवी मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली तयारी केली होती.’मिसेस इंडिया वन इन अ मिलियन 2023’ चा ताज मिळवण्याबरोबरच, रुपिकाने ‘बोल्ड अँड ब्युटीफुल क्लासिक’, ‘फिट क्लासिक’, आणि ‘टॅलेंटेड क्लासिक’ यासह अनेक टायटल्स जिंकले.

रुपिका ही वकील असून तिने अभिनय आणि मॉडेलिंगच्या या जगात प्रवेश केला आणि यश मिळवलं. तिने अमिताभ बच्चन आणि रणवीर सिंग सारख्या कलाकारांबरोबर काम केलं आहे. रुपिका ग्रोव्हरचा प्रवास सर्व वयोगटातील लोकांसाठी खूप प्रेरणादायी आहे. ५५ व्या वर्षी रुपिकाने मिळवलेलं हे यश खूपच कौतुकास्पद आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai based model and actress rupika grover won mrs india one in a million 2023 hrc