अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला ‘मैदान’ हा चित्रपट बुधवारी (१० एप्रिल रोजी) चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता, पण आता या चित्रपटाचं प्रदर्शन एक दिवस पुढे ढकलण्यात आलं आहे. अशातच चित्रपटाविरोधात दाखल केलेली एक याचिका मुंबई कोर्टाने फेटाळून लावली आहे. ही याचिका चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणण्यासंदर्भात होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

११ एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱ्या अजय देवगणच्या ‘मैदान’ या हिंदी चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास मुंबई न्यायालयाने सोमवारी नकार दिला. शूटिंगसाठी कॅमेरे पुरवणाऱ्या मेहराफ्रीन इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडकडून (MIPL) चित्रपटाचे निर्माते, बायव्यू प्रोजेक्ट्स एलएलपी आणि बोनी कपूर यांच्याविरुद्ध दिंडोशी येथील सिव्हील कोर्टात धाव घेतली होती.

मराठी बिझनेसमनशी लग्न करणाऱ्या अभिनेत्रीने साजरा केला पहिला गुढीपाडवा, खास फोटो केले शेअर

६४,५९,५७७ रुपयांची थकबाकी असल्याने चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणावी, असं याचिकाकर्त्याचं म्हणणं होतं. व्याजासह १,०७,२१,९३० रुपयांची थकबाकी असून ते पैसे चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी दिले जाईल, असं वचन निर्मात्यांनी दिलं होतं, असं एमआयपीएलने सांगितलं. त्यानंतर एमआयपीएलकडून २१ टक्के दराने व्याज व ६४,५९,५७७ रुपयांच्या न भरलेल्या थकबाकीसंदर्भात खटला दाखल करण्यात आला होता.

प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”

जोपर्यंत थकबाकी मिळत नाही तोवर चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणावी अशी मागणी त्यांनी केली होती. पण युक्तीवादानंतर कोर्टाचे न्यायाधिश ए झेड खान यांनी स्थगितीची मागणी फेटाळली. पण बायव्यूने दोन आठवड्यांच्या आत ९६,०६,७४३ रुपयांची बँक गॅरंटी सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.