बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या आगामी ‘शहजादा’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘भूलभुलैया २’ या चित्रपटानंतर कार्तिकचे चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पहात होते. कार्तिकसह या चित्रपटात अभिनेत्री क्रिती सनॉन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. कार्तिकच्या आधीच्या चित्रपटाच्या मानाने त्याचा हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचून आणण्यात अपयशी ठरला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या चित्रपटाच्या म्युझिक, सॅटेलाइट आणि ओटीटी राइट्समधून निर्मात्यांनी ६५ कोटी रुपये कमावले असले तरी बॉक्स ऑफिस मात्र हा चित्रपट म्हणावी तशी जादू करू शकलेला नाही. पहिल्या दिवसाप्रमाणेच दुसऱ्या दिवशीही हा चित्रपट काही खास कमाई करू शकलेला नाही. मीडिया रीपोर्टनुसार प्रदर्शनानंतरच्या दुसऱ्याच दिवशी या चित्रपटाने भारतात ७ ते ९ कोटीच्या आसपास कमाई केली आहे. आता कार्तिक पुन्हा एका अडचणीत सापडला आहे. नुकतंच मुंबई पोलिसांनी कार्तिकच्या नावे चलान फाडलं आहे.

आणखी वाचा : “मला प्रचंड राग…” बॉक्स ऑफिसवर ‘ॲन ॲक्शन हीरो’ या चित्रपटाच्या अपयशाबद्दल जयदीप अहलावत यांचं स्पष्ट वक्तव्य

कार्तिकने नुकतंच त्याच्या आई वडिलांची भेट घेतली आणि मुंबईतील परिसरात त्याची लक्झरी कार एका नो पार्किंग झोनमध्ये उभी असलेली दिसली. कार्तिक आर्यनच्या या आलीशान कारवर आता मुंबई पोलिसांनी कारवाई करत त्याला दंड ठोठावला आहे. इतकंच नाही तर कारचा फोटो शेअर करत त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्टही केला आहे. त्याबरोबरच मजेशीरपणे व्यक्त होत मुंबई पोलिसांनी कार्तिकला त्याची चूक लक्षात आणून दिली आहे.

मुंबई पोलिसांनी या पोस्टमध्ये लिहिलं, “समस्या ही आहे की ही कार चुकीच्या ठिकाणी उभी आहे. बॉलिवूडचा ‘शहजादा’असला म्हणून त्याने नियम मोडायचे या भ्रमात राहू नका.” नेटकऱ्यांनी ही पोस्ट शेअर करत मुंबई पोलिसांच्या या गोष्टीला दाद दिली आहे. ‘शहजादा’ हा चित्रपट अल्लू अर्जुनच्या ‘अला वैकुण्ठपुरामुलू’ या दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन व क्रिती सनॉनसह राजपाल यादव, परेश रावलसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.