बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या अगामी चित्रपट ‘जवान’मुळे चर्चेत आहे. एकीकडे शाहरुख जवानच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तर दुसरीकडे त्याच्या मन्नत बंगल्याबाहेर मोठ्या प्रमाणात आंदोलकांची गर्दी जमली होती. शाहरुखने ऑनलाइन गेमिंग अ‍ॅप्सला पाठिंबा दिल्याच्या निषेधार्थ हे आंदोलक मन्नतबाहेर प्रदर्शन करत होते. पोलिसांनी याबाबत कारवाई करत पाच आंदोलकांना अटक केली आहे. दरम्यान शाहरुखच्या बंगल्याबाहेर पोलीस सुरक्षेततही वाढ कऱण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांचा जीवनपट उलघडणार मोठ्या पडद्यावर; ‘हा’ अभिनेता साकारणार मुख्य भूमिका?

मिळालेल्या माहितीनुसार शाहरुखने काही दिवसांपूर्वी ऑनलाइन गेमिंग संबंधित अ‍ॅपची जाहीरात केली होती. अशा जाहिरातींचा समाज आणि तरुणांवर वाईट परिणाम होता. विशेषत: कलाकार जेव्हा अशा अ‍ॅपना पाठिंबा देतात तेव्हा तरुणांवर त्याचा जास्त प्रभाव पडतो. असं आंदोलकांच म्हणण होतं. आणि याचाच निषेध करण्यासाठी आंदोलक शाहरुखच्या मन्नत बंगल्याबाहेर जमले होते.

हेही वाचा- ‘गदर २’ पाहायला गेलेल्या तरुणाचा सिनेमा हॉलमध्ये पोहोचताच मृत्यू, घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर

पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पाच आंदोलकांना अटक केली आहे. तसेच मन्नतच्या सुऱक्षेत वाढही केली आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफऱ विरल भयानी यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्याच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस उभे असलेले दिसून आले. काही गाड्याही दिसत आहेत.

दरम्यान ‘जवान’ चित्रपट ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुखच्या जोडीला साऊथची तगडी स्टारकास्ट असणार आहे. यामध्ये शाहरुखबरोबर दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा, प्रियमणी, गिरिजा ओक, संजिता भट्टाचार्य, लहर खान, आलिया कुरेशी, रिद्धी डोंगरा, सुनील ग्रोव्हर आणि मुकेश छाबरा हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसतील. हिंदीबरोबरच हा चित्रपट तमिळ, तेलगु भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai police increase security outside shah rukh khan bungalow mannat due to protests dpj