अभिनेता शाहरुख खानला बॉलिवूडमध्ये येऊन नुकतीच ३१ वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने शाहरुख खानने #AskSRKच्या सेशनमधून ३१ मिनिटे चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी शाहरुखच्या चाहत्यांनी त्याच्या आजवरच्या प्रवासासंबंधित प्रश्न विचारले. यावर शाहरुखने गमतीशीर उत्तर दिली. यावेळी एका चाहत्याने शाहरुखचा ३१ वर्षांपूर्वीचा ‘दिवाना’ चित्रपटातील एका गाण्याचा व्हिडिओ ट्वीट करून प्रश्न विचारला होता. याच व्हिडिओची दखल मुंबई वाहतूक पोलिसांनी घेत यावर मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.

एका ट्वीटर युझरने शाहरुखच्या ‘दिवाना’ चित्रपटातील ‘कोई न कोई चाहिए प्यार करने वाला’ या गाण्यातील एक व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये शाहरुख विना हेल्मट रस्त्यावर फिरत आहे. यासंदर्भात युझरने शाहरुखला विचारले की, “सर तुमची ही एपिक एंट्री पाहून तुम्हाला कसे वाटते? याला आता ३१ वर्ष पूर्ण झाली आहेत, तरीही अजून आम्हाला हे पाहू भारी वाटते.”

Kurla accident case CCTV from bus seized Mumbai news
कुर्ला अपघात प्रकरणः बसमधील सीसीटीव्ही ताब्यात, २५ जणांचा जबाब नोंदवला
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Lalu Prasad Yadav Controversial comment
Lalu Prasad Yadav Video : “नयन सेंकने….”; नितीश कुमार यांच्या महिला संवाद यात्रेबद्दल लालू प्रसाद यादव यांचं आक्षेपार्ह वक्तव्य
salman khan mother danching with helan
Video : सलमान खानच्या आईने हेलन यांच्याबरोबर धरला ठेका; उपस्थितही पाहतच राहिले, व्हिडीओ होतोय व्हायरल
Shashank Ketkar
‘मुरांबा’ मालिकेचे ९०० भाग पूर्ण; व्हिडीओ शेअर करत शशांक केतकर म्हणाला, “खूप भावुक…”
filght Footage
विमानात नको त्या अवस्थेत सापडले जोडपे! Video झाला व्हायरल, क्रू सदस्यांची चौकशी सुरू, नेटकऱ्यांचा संताप
Salman Khan and Shah Rukh Khan attends Devendra Fadnavis Oath Ceremony
Video : मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला बॉलीवूडकरांची मांदियाळी! भर गर्दीत शाहरुख-सलमानच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष
isha kopikar not selected for don 2 movie
शाहरुख खानच्या सिनेमातून मराठमोळ्या अभिनेत्रीचा केलेला पत्ता कट; दु:ख व्यक्त करत म्हणाली, “मी निर्मात्यांना फोन…”

हेही वाचा – ‘खतरों के खिलाडी १३’ मधून ‘हा’ स्पर्धक बाहेर; टॉप ८ मध्ये कोणी मारली बाजी, जाणून घ्या

यावर शाहरुख म्हणतो की, “व्वा, आता कळाले की, ‘दिवाना’ चित्रपट बॉक्स हिट होऊन ३१ वर्ष पूर्ण झाली आहेत. हा खूप चांगला प्रवास होता. थँक्यू सगळ्यांना. आपण ३१ मिनिटं बोलू शकलो.”

तसेच त्याच ट्वीटला पुन्हा एकदा रिट्वीट करत शाहरुख म्हणाला की, “हेल्मेट घातले पाहिजे होते.” याच शाहरुखच्या ट्वीटची मुंबई वाहतूक पोलिसांनी दखल घेत म्हटले की, “स्वदेश असो किंवा परदेश, सेफ्टीचा बादशाह #हेल्मटहेना.” सध्या शाहरुखचे आणि मुंबई पोलिसांचे हे ट्वीट चांगलेच व्हायरल होत आहे.

हेही वाचा – ‘कौन बनेगा करोडपती’ होस्ट करण्यासाठी २३ वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी ठेवली होती ‘ही’ अट; निर्माते खुलासा करत म्हणाले…

हेही वाचा – इसे कहते है दोस्ती! करण जोहरसाठी वरुण धवनने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

दरम्यान शाहरुख खान सध्या ‘डंकी’च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. तसेच त्याचा ‘जवान’ चित्रपट ७ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘पठाण’च्या भरघोस यशानंतर शाहरुखच्या ‘जवान’ आणि ‘डंकी’ चित्रपटाकडून चाहत्यांना अधिक अपेक्षा आहेत.    

Story img Loader