चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी स्वत:च्या अभिनयातून वेगळे स्थान निर्माण केले आहे. अशा कलाकारांच्या कलाकृती नेहमीच चर्चेचा विषय असतात. वर्षानुवर्षे हे कलाकार अनेकांसाठी आदर्श असतात. या कलाकारांपैकी एक म्हणजे मुमताज होय. अभिनेत्री मुमताज यांचे नाव घेतल्यावर ‘आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर’ हे त्यांचे प्रसिद्ध गाणे चाहत्यांना आठवते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आज ३१ जुलैला मुमताज ७७ वाढदिवस साजरा करीत आहेत. ३१ जुलै १९४७ ला त्यांचा मुंबईमध्ये जन्म झाला. मुमताज यांनी चित्रपटसृष्टीत आपल्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली. वयाच्या ११ व्या वर्षी त्यांनी अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. १९५८ साली प्रदर्शित झालेल्या ‘लाजवंती’ व ‘सोने की चिडियाँ’ या चित्रपटांत त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले. १९६१ साली प्रदर्शित झालेला ‘स्त्री’ आणि १९६३ साली प्रदर्शित झालेला ‘सेहरा’ या चित्रपटांत त्यांनी छोट्या भूमिका निभावल्या आहेत.
मुमताज यांच्याबरोबर चित्रपटात काम करण्यासाठी अभिनेत्यांनी का दिला होता नकार?
अनेक चित्रपटांत लहान भूमिका साकारल्याने त्यांची बी ग्रेडची अभिनेत्री, अशी ओळख निर्माण झाली होती. त्यामुळे जेव्हा मुमताज यांना मुख्य नायिकेच्या भूमिकेत काम करायचे होते, त्यावेळी अनेक अभिनेत्यांनी त्यांच्याबरोबर काम करण्यास नकार दिला होता. त्याबद्दल बोलताना त्यांनी म्हटले होते की, मी डोळे बंद केले आणि काम केले. मी विचार केला की, बाकी सगळे देवाच्या हातात आहे. चित्रपटसृष्टीत माझ्या करिअरची जशी सुरुवात झाली होती, तशी होणे चुकीचे होते. माझ्याबरोबर काम कऱण्यासाठी अभिनेत्यांनी नकार दिला म्हणून मी त्यांना दोष देणार नाही. कारण- प्रत्येकाला यशापर्यंत घेऊन जाणारी पायरी हवी असते.
हेही वाचा: जान्हवी कपूरने सांगितली बॉयफ्रेंडच्या आईबद्दलची ‘ती’ गोष्ट; म्हणाली, “माझ्या कठीण काळात…”
बी ग्रेडचा दर्जा ही स्वत:ची ओळख बदलण्यासाठी अभिनेत्रीने दारा सिंग यांच्यासोबत अनेक चित्रपटांत काम केले. ‘भीमसेन’, ‘टार्जन कम्स टू दिल्ली’, ‘टार्जन अॅण्ड किंग काँग’ अशा चित्रपटांत त्यांनी एकत्र काम केले होते. मात्र या चित्रपटांनंतरदेखील त्यांना दर्जेदार चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या नाहीत. दिलीप कुमार यांच्यामुळे मुमताज यांना ‘राम और श्याम’ चित्रपटात मुख्य भूमिकेत काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांत मुख्य भूमिकेत काम केले. शम्मी कपूर, जितेंद्र, राजेश खन्ना, दिलीप कुमार, सुनील दत्त, धर्मेद्र, देव आनंद अशा अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत मुमताज यांनी मुख्य नायिकेच्या भूमिकेत काम केले आहे.
एका मुलाखतीदरम्यान, इतर अभिनेत्री त्यांच्या मैत्रिणी का नाहीत, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी म्हटले होते, “मला माहीत नाही. कोणाच्या मनात काय आहे. मी टॉमबॉय होते. मी मुलींपेक्षा कायम मुलांमध्ये जास्त असायचे. कोणत्याही अभिनेत्रीने मैत्रीचा हात पुढे केला नाही. लोकांना तुमच्याबद्दल हेवा वाटत असेल किंवा प्रेम वाटत असेल; त्याने काही फरक पडत नाही”, असे त्यांनी म्हटले होते.
‘टाइम्स एंटरटेन्मेंट’ला दिलेल्या एका मुलाखतीत शर्मिला टागोर यांच्याबरोबर असलेल्या स्पर्धेबद्दल बोलताना त्यांनी, “अभिनेत्री मैत्रिणी होऊ शकत नाहीत. आजही होऊ शकत नाहीत आणि कधीच त्या मैत्रिणी होऊ शकणार नाहीत. आम्ही कधीही एकत्र जेवण करीत नाही. बाहेर फिरायला जात नाही. हे कायम असेच चालत आलेले आहे”, असे म्हटले होते.
दरम्यान, बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेल्या या अभिनेत्रीला वयाच्या २७ व्या वर्षी मोठी प्रसिद्धी मिळाली होती. १७ वर्षांच्या करिअरमध्ये मुमताज यांनी १०० हून अधिक चित्रपटांतून काम केले. मात्र, १७ वर्षांच्या कारकिर्दीनंतर त्यांनी लग्नासाठी चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला. त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने गौरविण्यात आले होते.