शुक्रवारी (७ जून रोजी) प्रदर्शित झालेला ‘मुंज्या’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. चित्रपटाची चांगलीच चर्चा होत आहे. प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहांमध्ये गर्दी करत आहेत, परिणामी चित्रपटाने चार दिवसांत दमदार कलेक्शन केलं आहे. शुक्रवार व वीकेंडचे दोन दिवस बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवणाऱ्या ‘मुंज्या’ चित्रपटाच्या चौथ्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.
‘मुंज्या’ चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी ४.२१ कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये ८१.२५ टक्क्यांनी वाढ झाली आणि त्याने ७.४० कोटींचा व्यवसाय केला. ‘सॅकनिल्क’च्या, ट्रेंड रिपोर्टनुसार, प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी सुट्टीच्या दिवशी ‘मुंज्या’ ने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी ८.४३ कोटी रुपयांची कमाई केली. ‘मुंज्या’चे तीन दिवसांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन २०.०४ कोटी झाले होते.
चौथ्या दिवशी या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. चौथ्या दिवसाची कमाई पाहता ती तिसऱ्या दिवसाच्या तुलनेत कमी असली तरी सोमवारी सुट्टीचा दिवस नसताना चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिलाय असं दिसतंय. चित्रपटाने सोमवारी ३.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने चार दिवसांत बॉक्स ऑफिसवर २३.७९ कोटी रुपये कमावले आहेत.
‘मुंज्या’ची तिसऱ्या दिवशीही जबरदस्त कमाई, ३० कोटींचे बजेट असलेल्या चित्रपटाने रविवारी कमावले तब्बल…
कोकणात प्रचलित असलेल्या मुंज्याच्या दंतकथेचा आधार घेत चित्रपटाची कथा लिहिण्यात आली आहे. कोकणात चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात आलं आहे. या हिंदी चित्रपटात शर्वरी वाघ, अभय वर्मा, मोना सिंह यांच्याबरोबरच सुहास जोशी, अजय पूरकर, भाग्यश्री लिमये, श्रुती मराठे हे कलाकार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलं आहे.
सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बालच्या लग्नाबद्दल शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, “आजकालची मुलं आई-वडिलांची…”
चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल अभिनेत्री शर्वरी वाघ म्हणाली, “मला महाराष्ट्रीय असल्याचा अभिमान आहे, त्यामुळे मराठी लोककथेवर आधारित चित्रपटाला मिळणारं इतकं प्रेम पाहून आणि लोक त्याचं कौतुक करत आहेत हे पाहणं खूप छान वाटतंय. महाराष्ट्रीय लोककथा राष्ट्रीय स्तरावर गाजत आहेत आणि त्यावर बनलेला एक चित्रपट हिट होतोय, हे पाहून मला खूप आनंद होतोय.”
‘मुंज्या’ हा ‘स्त्री’, ‘रूही’ आणि ‘भेडिया’ नंतर मॅडॉक सुपरनॅचरल युनिव्हर्सचा चौथा चित्रपट आहे. हा चित्रपट लिजेंड ऑफ मुंज्याभोवती फिरतो. कोकणातील लोककथांवर आधारित हा चित्रपट आहे.