‘मुंज्या’फेम अभिनेता अभय वर्मा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आहे. या ब्लॉकबास्टर चित्रपटात अभयने बिट्टू ही भूमिका साकारली आहे. ‘मुंज्या’च्या टीमचं आणि अभयच्या या चित्रपटातील अभिनयाचं सर्वत्र कौतुक सुरू आहे.

अभयनं ‘लिटिल थिंग्स’ या वेब सीरिजमधून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. मग सफेद, ए वतन मेरे वतन अशा चित्रपटांमध्ये तो झळकला. मनोज बाजपेयी यांच्या ‘फॅमिली मॅन-२’ या बेब सीरिजमधील अभयच्या भूमिकेमुळे तो प्रसिद्धीझोतात आला.

Junaid khan says he releasing film on youtube is best
थिएटर व OTT च्या वादावर आमिर खानचा मुलगा म्हणाला, “चित्रपट युट्यूबवर मोफत…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
salman khan did not select in vivah movie
‘विवाह’मध्ये सलमान खानऐवजी शाहिद कपूरला का घेतलं होतं? दिग्दर्शक म्हणाले, “त्या भूमिकेसाठी निरागसपणा…”
aamir khan appreciated ilu ilu 1998 movie and Ajinkya phalke
आमिर खानला ‘या’ नव्या मराठी चित्रपटात काम करण्याची होती इच्छा पण…; अभिनेता मराठीत संवाद साधत म्हणाला…
chhaava movie lezim scene controversy marathi actress ruchira jadhav
“चित्रपट बघण्याआधीच निर्बुद्धपणे…”, ‘छावा’च्या वादावर मराठी अभिनेत्रीचं स्पष्ट मत; म्हणाली, “माझ्या राजाला…”
Uday Samant on chhava movie
Chhava Movie Controversy : अखेर छावा चित्रपटातला ‘तो’ वादग्रस्त भाग काढला; मंत्री उदय सामंत म्हणाले…
Chhaava Trailer Outrage Uday Samant
Chhaava Movie Trailer: “..तर चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही”, ‘छावा’बाबत सरकारची स्पष्ट भूमिका; उदय सामंत म्हणाले…
Junaid Khan sat outside at Ira Khan wedding
बहिणीच्या लग्नात कुटुंबाने दिली नाही कोणतीच जबाबदारी, बाहेर बसला होता जुनैद खान, कारण…

हेही वाचा… “मला तुरुगांत टाकायला…”, समांथा रुथ प्रभुने सांगितला डॉक्टरांनी दिलेला धक्कादायक सल्ला, म्हणाली…

अभय याआधी झोया अख्तर दिग्दर्शित ‘द आर्चिज’मध्ये काम करणार होता. नुकत्याच डिजिटल कमेंटरीला दिलेल्या मुलाखतीत अभय वर्माने खुलासा केला की, सुहाना खान, खुशी कपूर, अगस्त्य नंदा अभिनीत ‘द आर्चिज’मध्ये त्याला एका रोलची ऑफर आली होती. परंतु, अभयनं ‘द आर्चिज’पेक्षा संदीप सिंग दिग्दर्शित ‘सफेद’ला प्राधान्य दिलं.

हेही वाचा… “तरस नहीं आया…”, पुष्कर जोगने ‘या’ अभिनेत्रीसह केला भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

जेव्हा अभयला विचारण्यात आलं की, ‘सफेद’ चित्रपटासाठी त्यानं ‘द आर्चिज’ला नकार दिला होता का? तर त्यावर अभय म्हणाला, “हो, दोन्ही चित्रपटांचं शूटिंग एकाच वेळी होणार होतं.”

हेही वाचा… अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या संगीत सोहळ्यासाठी जस्टिन बीबरची भारतात एन्ट्री, जगप्रसिद्ध गायक घेणार ‘इतक्या’ कोटींचं मानधन!

अभय पुढे म्हणाला, “आर्चिज प्रोजेक्ट निवडण्याच्या प्रोसेसमध्ये मी होतो; पण मला ‘सफेद’ करायचाच होता. मी ‘द आर्चिज’साठी ऑडिशन दिलं आणि झोयाला भेटलो. पण, ‘सफेद’चं सिलेक्शन झालंच होतं; मग मी तोच चित्रपट निवडण्याचा निर्णय घेतला.”

हेही वाचा… हिना खानने केस कापताच अभिनेत्रीच्या आईचे अश्रू अनावर, कर्करोगाचं निदान होताच घेतला मोठा निर्णय; म्हणाली, “मला हा मानसिक त्रास…”

दरम्यान, अभय वर्माच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर आदित्य सरपोतदार दिग्दर्शित मुंज्या या चित्रपटात अभयनं प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट ७ जून २०२४ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभयबरोबर शर्वरी वाघ प्रमुख भूमिकेत झळकली आहे. तर, मोना सिंग, सुहास जोशी, सत्यराज, भाग्यश्री लिमये, अजय पुरकर अशा अनेक कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटात आहेत. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. ३० कोटींचा बजेट असलेल्या या सिनेमानं आतापर्यंत १२३.७६ कोटींचा व्यवसाय केला आहे.

Story img Loader