सध्या बॉक्स ऑफिसवर ‘मुंज्या’ चित्रपटाचा जलवा पाहायला मिळत आहे. ७ जून रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची दमदार कमाई १० दिवसांनंतरही सुरूच आहे. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘मुंज्या’ कोकणातील लोककथेवर आधारित आहे. या सिनेमाने कार्तिक आर्यनच्या ‘चंदू चॅम्पियन’ला चांगलीच टक्कर दिली आहे.

‘मुंज्या’ ७ जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाने पहिल्या आठवड्यात जबरदस्त कलेक्शन केले आणि दुसऱ्या आठवड्यातही झपाट्याने कमाई करत आहे. या चित्रपटाने दुसऱ्या शनिवारी कार्तिक आर्यनच्या चित्रपटाची बरोबरी केली आहे. आता या दोन्ही चित्रपटांमध्ये चांगलीच स्पर्धा पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्राच्या दिवंगत माजी मुख्यमंत्र्यांची नात आहे ‘मुंज्या’तील अभिनेत्री, कतरिना कैफच्या दिराशी जोडलं जातंय नाव

‘मुंज्या’ चित्रपटाची एकूण कमाई किती?

मुंज्याने पहिल्या आठवड्यात एकूण ३५.३ कोटी रुपयांची कमाई केली आणि शनिवारी त्याच्या कलेक्शनमध्ये ८५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. या चित्रपटाने १० दिवसांत एकूण ३६.४५ कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटाने रविवारी ८.५ कोटी रुपयांची कमाई केली. आज सोमवारी ईद-उल-अधाची सुट्टी आहे, त्यामुळे त्याचा फायदा चित्रपटाला होण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास आज हा चित्रपट ६० कोटींचा टप्पा गाठेल. या चित्रपटाचं बजेट ३० कोटी रुपये आहे. या हिंदी चित्रपटात शर्वरी वाघ, अभय वर्मा, सुहास जोशी, मोना सिंह, अजय पूरकर, भाग्यश्री लिमये, श्रुती मराठे हे कलाकार आहेत.

लोकप्रिय अभिनेत्रीने अवघ्या २४ व्या वर्षी घेतलं मुंबईत घर, काही दिवसांपूर्वीच घेतली मर्सिडीज, पूजेचे फोटो केले शेअर

‘चंदू चॅम्पियन’चे तिने दिवसांचे कलेक्शन किती?

कार्तिक आर्यनच्या ‘चंदू चॅम्पियन’ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी ५.४० कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली आणि त्याने ७.७० कोटींचा व्यवसाय केला. आता ‘चंदू चॅम्पियन’च्या रिलीजच्या तिसऱ्या दिवसाच्या म्हणजेच रविवारी कमाईचे आकडे आले आहेत. तरण आदर्शच्या माहितीनुसार, ‘चंदू चॅम्पियन’ने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी ११ कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह ‘चंदू चॅम्पियन’चे तीन दिवसांचे एकूण कलेक्शन आता २४.११ कोटी रुपये झाले आहे. या चित्रपटाचं बजेट १४० कोटी रुपये आहे.

‘चंदू चॅम्पियन’चे बजेट १४० कोटी! कार्तिक आर्यनने घेतलं तब्बल ‘इतकं’ मानधन, इतर कलाकारांची फी जाणून घ्या

‘चंदू चॅम्पियन’ हा देशातील पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर यांचा बायोपिक आहे. या चित्रपटात कार्तिकने मुरलीकांत यांची मुख्य भूमिका साकारली आहे. मुरलीकांत यांचा एक सैनिक आणि बॉक्सर होण्यापासून ते गंभीर दुखापतीतून बरा झाल्यानंतर जलतरणपटू होण्यापर्यंतचा आश्चर्यकारक प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन व्यतिरिक्त भुवन अरोरा, राजपाल यादव, यशपाल शर्मा, विजय राज, अनिरुद्ध दवे, पलक लालवानी आणि इतर कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.