Ayodhya Ram Mandir Opening Ceremony: आज देशभरात राममय वातावरण पाहायला मिळत आहे. अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन झाले आहे. शिवाय राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मिळून पूजा केली. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला बॉलीवूडसह दाक्षिणात्य सुपरस्टार्स उपस्थित राहिले आहेत.
या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, माधुरी दीक्षित, रणबीर कपूर, आलिया भट्ट, रोहित शेट्टी, आयुष्मान खुराना, राजकुमार हिरानी, विक्की कौशल, कतरिना कैफ, कंगना रणौत, मधुर भांडारकर असे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. याशिवाय प्रसिद्ध गायक, संगीतकार देखील या सोहळ्याला उपस्थित आहेत. अशातच प्रसिद्ध संगीतकार, गायक अनु मलिक यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
हेही वाचा – Video: “राम सिया राम…”, प्रसिद्ध गायकांच्या आवाजातील भजनांनी दुमदुमली अयोध्यानगरी, व्हिडीओ व्हायरल
या व्हिडीओत अनु मलिक म्हणतायत की, अलीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मी संगीतबद्ध केलेलं भजन आवडतं असं सांगितलं होतं. ही एक सुंदर अनुभूती असून इथे उपस्थित राहून मला खूप आनंद झाला आहे. जेव्हा मी राम मंदिराच्या परिसरात प्रवेश केला तेव्हा पहिल्यांदा हे मंदिर पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं.
हेही वाचा – Video: झेंडा नाचवत, जय श्रीरामाचा जयघोष करत अभिनेत्याचा डान्स; नेटकरी म्हणाले, “क्या बात है..”
दरम्यान, राम मंदिरातील गाभाऱ्यात प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली रामलल्लाची मूर्ती ही सावळ्या रंगाची आहे. शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवलेली ही रामाची मूर्ती ५१ इंच उंच असून या मूर्तीचं वजन २०० किलो इतकं आहे. पाच वर्षे वय असलेल्या मुलाची उंची ही सरासरी ४५ चे ६० इंच इतकी असते. त्यामुळे रामाच्या या बालरुपाची मूर्ती ५१ इंचांची आहे. तसेच हिंदू धर्मात ५१ हा अंक शुभ मानला जातो.