Bollywood Actress Personal Life : बॉलीवूडमध्ये शाहरुख खान- गौरी खान, करीना कपूर- सैफ अली खान, सोहा अली खान- कुणाल खेमू अशी अनेक आंतरधर्मीय जोडपी आहेत. अशाच एका मुस्लीम बॉलीवूड अभिनेत्रीने दोन लग्नं केली. तिचे दोन्ही जोडीदार हिंदू होते. तिच्या दुसऱ्या लग्नात तिचा २४ वर्षांचा मुलगा देखील उपस्थित होता. कोण आहे ही अभिनेत्री? जाणून घेऊयात.
बॉलीवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांचे वैयक्तिक आयुष्य त्यांच्या चित्रपटांपेक्षा जास्त चर्चेत राहिले. काही अभिनेत्री तर चित्रपटसृष्टी सोडून गायब झाल्या आणि परत इंडस्ट्रीत आल्याच नाहीत. अशीच एक अभिनेत्री होती जी दिसायला खूप सुंदर होती आणि तिने अमिताभ बच्चन, ऋषी कपूर अशा अनेक मोठ्या स्टार्सबरोबर काम केलं होते. या अभिनेत्रीला तुम्ही अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये पाहिले असेल. या अभिनेत्रीने ‘त्रिदेव’मध्ये मुख्य भूमिका केली होती. या अभिनेत्रीचे खरे नाव बख्तावर खान आहे, पण ती चित्रपटसृष्टीत वेगळ्या नावाने ओळखली जायची. ‘तिरछी टोपी वाले’ फेम ही अभिनेत्री म्हणजे सोनम खान होय.
१९ व्या वर्षी केलं १७ वर्षांनी मोठ्या व्यक्तीशी लग्न
सोनम खानचे वैयक्तिक आयुष्य खूप चढ-उतारांनी भरलेले राहिले. तिने दोनदा लग्न केले. तिचे दोन्ही पती हिंदू होते. सोनमने आधी हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले आणि नंतर धर्म बदलला. तिचं पहिलं लग्न मोडल्यावर सोनमने पुन्हा एका हिंदू व्यक्तीशी लग्न केले. अभिनेत्रीला पहिल्या लग्नापासून असलेला मुलगा गौरव राय देखील तिच्या दुसऱ्या लग्नाला उपस्थित होता.
सोनमने १९ व्या वर्षी तिच्यापेक्षा १७ वर्षांनी मोठ्या चित्रपट दिग्दर्शक राजीव रायशी लग्न केलं होतं. तिच्या सासऱ्यांचं नाव गुलशन रॉय होतं आणि त्यांनी ‘दीवार’ आणि ‘मोहरा’ सारखे चित्रपट केले होते. पती आणि सासरच्या मंडळींनी बनवलेल्या ‘त्रिदेव’ या चित्रपटात सोनमने काम केलं होतं. राजीव रायशी लग्न केल्यानंतर तिला अंडरवर्ल्डकडून धमक्या आल्या आणि तिने अवघ्या सहा वर्षांनी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला. मुंबई सोडून ती ब्रिटनला निघून गेली. सोनमचे पहिले लग्न २०१६ मध्ये मोडले.
घटस्फोटानंतर वर्षभराने केलं दुसरं लग्न
घटस्फोटानंतर दुसऱ्या वर्षी सोनमने तिचा बॉयफ्रेंड मुरली याच्याशी उटी येथे लग्न केले. सोनम व मुरलीची भेट पुद्दुचेरीत झाली होती. सोनम व मुरली यांच्या लग्नात तिचा मुलगा गौरव उपस्थित होता. सोनम खान ही खलनायकाची भूमिका साकारून लोकप्रिय झालेले अभिनेते रझा मुराद यांची भाची आहे. आता सोनम खान ५२ वर्षांची झाली असून ती फिल्मी दुनियेपासून दूर आहे. ‘त्रिदेव’, ‘मिट्टी और सोना’, ‘क्रोध,’ ‘प्यार का कर्ज’, ‘अजूबा’, ‘फतेह’, ‘कोहराम’, ‘विश्वात्मा’, ‘बाज’ आणि ‘इन्सानियत’ हे सोनम खानचे गाजलेले चित्रपट आहेत.