Kangana Ranaut : बॉलीवूडची क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौत कधी वादग्रस्त विधानांमुळे तर कधी वैयक्तिक आयुष्यातील घटनांमुळे सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतात. सध्या त्या चर्चेत येण्याचं कारण देखील तितकंच खास आहे. नुकतीच कंगना यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी नेहमीप्रमाणे बॉलीवूडवर टीका केली. तसंच आपल्या आजवरच्या चित्रपटाविषयी काही किस्से सांगितले. यावेळी कंगना यांनी ‘मर्डर’ चित्रपटासंबंधित एक किस्सा सांगितला.
अभिनेत्री कंगना रणौत यांचा ‘इमर्जन्सी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचं प्रमोशन करताना त्या दिसत आहेत. या चित्रपटानिमित्ताने कंगना यांनी राज शमानी यांच्या पॉडकास्टवर हजेरी लावली होती. यावेळी कंगना यांनी अनेक धमाल किस्से सांगितले. ‘गँगस्टर’ सिनेमातून कंगना यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमाच्या निर्मिती व दिग्दर्शनाची जबाबदारी अनुराग बासुने सांभाळली होती. या चित्रपटात कंगना इम्रान हाश्मीबरोबर प्रमुख भूमिकेत झळकल्या होत्या. याच चित्रपटाबाबत सांगताना कंगना यांनी ‘मर्डर’ विषयी किस्सा सांगितला. त्या म्हणाल्या, “माझ्या घरच्यांना या इंडस्ट्रीबाबत फार माहित नव्हतं. जेव्हा मला अनुरागने ‘मर्डर’ सिनेमासाठी विचारणा केली. तेव्हा मी माझ्या वडिलांना सांगितलं की, ‘गँगस्टर’ ज्याने दिग्दर्शित केला आहे, तोच अनुराग ‘मर्डर’ सिनेमा करतोय आणि त्याने मला या सिनेमासाठी विचारलं आहे. हे ऐकताच माझे वडील खूप संतापले आणि थेट घरी यायला सांगितलं.”
हेही वाचा – Video : “माझ्या बाबांना आभाळाएवढं…”, कार्तिकी गायकवाडने वडिलांसाठी गोंदवला खास टॅटू! शेअर केला व्हिडीओ
पुढे कंगना म्हणाल्या, “‘मर्डर’ सिनेमा येणार असल्याची माहिती त्यांच्यापर्यंत चुकीच्या पद्धतीने पोहोचली होती. त्यामुळे ते काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. सुरुवातीला हा सिनेमा चित्रांगदा सिंहला विचारण्यात आला होता. मात्र काही कारणांमुळे तिचं कास्टिंग झालं नाही आणि हा सिनेमा मला विचारण्यात आला.”
काँग्रेस पक्षाशी संबंधित असलेल्या व्यक्तीच्या मदतीने कंगना यांना मिळालेला पासपोर्ट
सिनेमाचं चित्रिकरण परदेशात होणार होतं तेव्हा प्रॉडक्शन टीमने माझ्याकडे पासपोर्ट मागितला. आमच्या कुटुंबात कधीच कोणी परदेशात गेलं नव्हतं त्यामुळे पासपोर्ट काय असतो, तो कशासाठी वापरतात? यातलं मला काहीच माहित नव्हतं. मी खूप घाबरले होते. एका पासपोर्टमुळे माझ्या हातातून सिनेमा जाणार तर नाही ना? असं वाटतं होतं. तेव्हा मी माझ्या वडिलांना पासपोर्टबद्दल आणि माझा कामाशी असलेल्या प्रामाणिकपणा यासगळ्याबद्दल सांगितलं. तेव्हा काँग्रेस पक्षाशी संबंधित ओळखीतल्या व्यक्तीच्या मदतीने मला दोन दिवसांत पासपोर्ट मिळाला. त्यानंतर मी सिनेमाच्या चित्रिकरणासाठी दक्षिण कोरियाला पहिल्यांदा गेली होती. तो माझा पहिला परदेश दौरा होता, असं कंगना म्हणाल्या.
राज शमानी यांच्या पॉडकास्टमध्ये कंगना यांनी सिनेमाव्यतिरिक्त संवाद साधताना सामाजिक, राजकीय आणि बॉलीवूड यांसारख्या बऱ्याच मुद्द्यांवर खळबळजनक खुलासा केला. “बॉलीवूडच्या कलाकारांना पार्ट्यांमध्ये फक्त दुसऱ्यांबद्दल चर्चा करायला आवडतं. कोणी चांगलं काम करत असेल तर त्यांच्याबद्दल वाईट अफवा कशा पसरवायच्या हे बॉलीवूड स्टार्सना खूप चांगलं जमतं. मला या अशा पार्ट्यांना जाणं म्हणजे वेळ वाया घालवणं वाटतं,” असं कंगना रणौत यांनी सांगितलं.
हेही वाचा – “जर सुरज चव्हाणने बिग बॉसची ट्रॉफी जिंकली तर मी पुढचा सीझन बघणार नाही”, असं का म्हणाली अभिनेत्री?
पुढे अभिनेत्री म्हणाल्या की, इतकी वर्ष या सिनेविश्वात काम करतेय, त्यामुळे कोण कसं आहे? हे मी चांगलंच ओळखून आहे. बॉलीवूड कलाकार मूर्ख आहेत. त्यांना अक्कल नाही अशा तीव्र शब्दांत तिने सिनेविश्वावर ताशेरे ओढले.