दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू व अभिनेता नागा चैतन्य ही मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोडी होती. २०१७ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. तर २०२१ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. घटस्फोट झाला असला तरीही दोघे त्यांच्या नात्यामुळे सातत्याने चर्चेत असतात. दरम्यान नागा चैतन्यने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केली आहे. या पोस्टनंतर समांथा आणि नागामध्ये भांडण मिटले असून दोघे पुन्हा एकत्रे आले असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा- इस्रायलवरील हल्ल्याबद्दल शोक व्यक्त करणाऱ्यांना स्वरा भास्कर म्हणाली ‘ढोंगी’; पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ अभिनेत्रीची पोस्ट

नुकतच नागा चैतन्यने त्याच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याच्याबरोबर सामांथाचा पाळीव श्वान हॅश दिसत आहे. हा फोटोला नागाने ‘vibe’ असे कॅप्शन दिलं आहे. या पोस्टनंतर चाहते समांथा आणि नागा पुन्हा एकत्र आले असल्याच्या अंदाज लावत आहेत. तर काहींनी दोघांना पॅचअप करण्याचा सल्लाही दिला आहे. सध्या समांथा इटलीमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. या ट्रीपचे फोटो समंथाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. समांथा इटलीत असल्यामुळे नागा चैतन्य तिच्या पाळीव श्वान हॅशची काळजी घेत आहे.

या पोस्टवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. एकाने कमेंट करत लिहिलं “मित्रांनो पॅच अप करा. हॅशसाठी करा” तर, दुसऱ्याने लिहिलं “सामांथासोबत पॅच अप कर. तुम्ही दोघे एकत्र छान दिसता.” आणखी एका चाहत्याने लिहिल “प्लीज तुम्ही दोघे पॅच अप करा, आम्हाला तुम्ही दोघे एकत्र खूप आवडता. जेव्हा तुम्ही पॅच अप कराल, तेव्हा आम्ही याचा आनंद साजरा करू.”

हेही वाचा- ‘बंटी और बबली’सारखा चित्रपट देणाऱ्या शाद अलीची कोर्टात धाव; स्क्रिप्ट चोरल्याचा दिग्दर्शकाचा आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागा चैतन्य आणि समांथा २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या माया चेसॉ चित्रपटाच्या सेटवर पहिल्यांदा भेटले. हळूहळू त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. काही वर्ष एकमेंकांना डेट केल्यानंतर दोघांनी २०१७ मध्ये लग्नगाठ बांधली. मात्र नागा आणि समांथाचं हे नात जास्त काळ टिकलं नाही. लग्नाच्या चार वर्षानंतर २०२१ मध्ये दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.