‘रांझना’, ‘तनु वेड्स मनु’ अशा एकापेक्षा एक हिट चित्रपटांचं दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक आनंद एल राय यांचा नवाकोरा चित्रपट ‘नखरेवाली’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये याचा टीझर प्रदर्शित झाला होता. आता लवकरच हा सिनेमादेखील प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
मराठमोळा दिग्दर्शक व लेखक हेमंत ढोमे याने त्याच्या ‘चलचित्र मंडळी’ या फिल्म प्रॉडक्शन हाऊसच्या सोशल मीडिया पेजवर या चित्रपटाच पोस्टर शेअर करीत ‘नखरेवाली’च्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. “प्यार का नया नखरा लेके आ रहे है व्हॅलेंटाईन्स २०२५ पर” असं कॅप्शन देत हे पोस्टर शेअर करण्यात आलंय. काही महिन्यांपासून व्हायरल होत असलेलं संजू राठोड याचं ‘गुलाबी साडी’ हे गाणं या पोस्टरला जोडलं गेलं आहे.
‘नखरेवाली’ चित्रपटात नवोदित कलाकार अंश दुग्गल आणि प्रगती श्रीवास्तव प्रमुख भूमिकांत दिसणार आहेत. अंश दुग्गल हा एक मॉडेल आहे; ज्यानं प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रासाठी रॅम्प वॉक केला आहे. तर, प्रगती श्रीवास्तवनं यापूर्वी अनेक तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
हेही वाचा: “…घाबरून चालणार नाही”, हिना खानने शेअर केली तिच्या ‘कर्करोगाचा प्रवास’ सांगणारी पोस्ट , म्हणाली…
हेमंत ढोमे व आनंद एल. राय यांनी ‘झिम्मा-२’ चित्रपटासाठी एकत्र काम केलं आहे. ‘झिम्मा-२’चं दिग्दर्शन व लेखन हेमंत ढोमे यानं केलं आहे; तर या चित्रपटाची निर्मिती आनंद एल. राय यांनी केली आहे. हेमंत ढोमे याने शेअर केलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय. ‘नखरेवाली’चं पोस्टर पाहून अनेकांनी त्यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
‘नखरेवाली’च्या या हटके पोस्टरमध्ये अभिनेता शर्टलेस दिसतोय आणि त्याने चक्क गुलाबी रंगाचा लेहंगा घातलेला दिसतोय. तर अभिनेत्री निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये आपल्याला पाहायला मिळतेय. तसंच या पोस्टरमध्ये दोघं एकमेकांना किस करतानादेखील दिसतायत.
हेही वाचा… सोनाक्षी सिन्हाने अनवाणी चालत पती झहीर इक्बालबरोबर शेअर केला ‘हा’ व्हिडीओ, म्हणाली, “जेव्हा तुम्ही…”
दरम्यान, ‘नखरेवाली’ या चित्रपटाचं दिग्दर्शन आनंद एल. राय यांनी केलं असून याची निर्मिती ज्योती देशपांडे, आनंद एल. राय आणि हिमांशु शर्मा यांनी केली आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी फेब्रुवारी २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे. आनंद एल. राय यांनी अलीकडेच चित्रपट पूर्ण झाल्याबद्दल कलाकार आणि क्रूसाठी एक पार्टी आयोजित केली होती.
© IE Online Media Services (P) Ltd