आज जगभरात वर्ल्ड सिबलिंग डे साजरा केला जात आहे. सामान्यांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत सर्वजण आपापल्या भावंडांबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत. त्यांच्याप्रति प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. वर्ल्ड सिबलिंग डे निमित्ताने अनेकजण भावना व्यक्त करताना दिसत आहे. आता अभिनेत्री नम्रता शिरोडकर(Namrata Shirodkar)ने बहिणीबरोबरचे जुने फोटो शेअर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
नम्रता शिरोडकरने शेअर केला बहिणीबरोबरचा जुना फोटो
नम्रता शिरोडकर आणि शिल्पा शिरोडकर या दोन बहिणींमधील बॉण्डिंग कायमच चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसते. अनेकदा शिल्पा शिरोडकर बहीण नम्रताबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. तर नम्रतादेखील शिल्पाबरोबरचे काही खास क्षण सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. आता वर्ल्ड सिंबलिंग डे निमित्ताने नम्रता शिरोडकरने शेअर केलेल्या फोटोंमध्ये दोघीही पारंपारिक वेशभूषेत दिसत आहेत. दोघींनीही साडी नेसली असून त्यावर सोन्याचे दागिने घातले असल्याचे दिसत आहेत. नम्रताने गुलाबी आणि हिरव्या रंगाची साडी नेसली असून शिल्पाने सोनेरी रंगाची साडी नेसली आहे. दोघींच्याही चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. हा फोटो शेअर करताना नम्रताने शिल्पाला सिंबलिंग दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शिल्पाने नम्रताच्या या फोटोवर कमेंट करत “तू माझी शक्ती आहेस. चिंटुकली माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे”, असे लिहित तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
नम्रताच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स करत दोघींचे कौतुक केले आहे. अनेकांनी या पोस्टवर हार्ट इमोजी शेअर करीत प्रेम व्यक्त केले आहे. तर काहींनी दोघी सारख्याच दिसत असल्याचे म्हटले आहे. जेव्हा शिल्पा शिरोडकर जेव्हा बिग बॉस १८ मधून जेव्हा बाहेर पडली होती, त्यावेळी नम्रताने शिल्पाबरोबर फोटो शेअर केले होते. हे फोटो शेअर करीत अभिनेत्रीने शिल्पा परत आल्याचा आनंद झाला आहे, असे म्हटले होते.

शिल्पा शिरोडकरनेदेखील नम्रताबरोबरचे काही जुने फोटो शेअर केले आहेत. तसेच नम्रता तिची सपोर्ट सिस्टम असल्याचेदेखील तिने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
नम्रता शिरोडकरने तेलुगु अभिनेता महेश बाबू बरोबर लग्नगाठ बांधली आहे. १९९३ साली झालेल्या मिस इंडिया स्पर्धेची अभिनेत्री विजेती ठरली होती. तर मिस युनिव्हर्समध्ये ती सहाव्या स्थानापर्यंत पोहोचली होती. ‘कच्चे धागे’, ‘वास्तव: द रिअॅलिटी’ आणि ‘पुकार’ अशा चित्रपटांतून अभिनेत्रीला एक वेगळी ओळख मिळाली. याबरोबरच अभिनेत्री ‘दिल विल प्यार व्यार’, ‘अस्तित्व’ यांसारख्या सिनेमांतही अभिनेत्रीने काम केले आहे.
शिल्पा शिरोडकरने १९८९ ते २००० या काळात मोठ्या प्रमाणात काम केले. १३ वर्षांच्या ब्रेकमध्ये तिने एका टीव्ही मालिकेतून पुनरागमन केले. एक मुठ्ठी आसमान असे या मालिकेचे नाव होते. नुकतीच अभिनेत्री बिग बॉसच्या १८ व्या पर्वात सहभागी झाली होती. या पर्वातून अभिनेत्रीने तिच्या खेळाने सर्वांचे मन जिंकले. अगदी शेवटच्या टप्प्यात अभिनेत्रीनेला खेळातून बाहेर जावे लागले. आता अभिनेत्री कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.