नाना पाटेकर यांचा ‘वनवास’ चित्रपट शुक्रवारी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात उत्कर्ष शर्मा व सिमरत कौरदेखील आहे. नाना पाटेकर त्यांचा खास मित्र अभिनेता आमिर खानसाठी या सिनेमाचे स्क्रीनिंग ठेवणार आहेत, अशी चर्चा होती. याच दरम्यान, या दोघांच्या एका व्हिडीओने लक्ष वेधून घेतले आहे.

नाना व आमिर यांनी आज मुंबईतील जुहू येथे पॉडकास्टसाठी शूटिंग केलं. या शूटिंगदरम्यानचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दोघांच्या पॉडकास्टबद्दलही चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. नाना पाटेकर आणि आमिर खान ‘वनवास’वर या पॉडकास्टमध्ये चर्चा करताना दिसतील.

हेही वाचा – नाना पाटेकर यांच्या पत्नीला पाहिलंत का? फक्त ७५० रुपयांत केलेलं लग्न; ‘अशी’ झालेली दोघांची पहिली भेट

नाना पाटेकर व आमिर खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फिल्मीज्ञानने शेअर केलेल्या या व्हिडीओत दोघेही कठड्यावर बसून गप्पा मारताना दिसत आहे. कॉटनचे कपडे घातलेले नाना पाटेकर व आमिर खान दोघांच्या साधेपणाचं नेटकरी कौतुक करत आहेत.

हेही वाचा – नाना पाटेकर गावात राहण्याबद्दल झाले व्यक्त, अमिताभ बच्चन यांनी दिनचर्येबद्दल विचारल्यावर म्हणाले, “माझ्याकडे दोन गाई…”

nana patekar aamir khan video
नाना पाटेकर व आमिर खानच्या व्हिडीओवरील कमेंट्स

इन्स्टंट बॉलीवूडने शेअर केलेल्या दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये नाना पाटेकर व आमिर खान हातात हात घालून गप्पा मारताना दिसत आहेत.

‘वनवास’चे पहिल्या दिवसाचे कलेक्शन

नाना पाटेकरांच्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी फार चांगली कमाई केलेली नाही. चित्रपटाला एक कोटीही कमावता आले नाही. चित्रपटाची ओपनिंग निराशाजनक राहिली आहे. सॅकनिल्कने दिलेल्या आकडेवारीनुसार, ‘वनवास’ने पहिल्या दिवशी ६० लाख रुपये कमावले आहेत. ही प्रारंभिक आकडेवारी आहे.

हेही वाचा – ‘वनवास’ची निराशाजनक सुरुवात, नाना पाटेकरांच्या सिनेमाने पहिल्या दिवशी कमावले फक्त ‘इतके’ लाख

‘वनवास’मध्ये नाना पाटेकर, उत्कर्ष शर्मा, सिमरन कौर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सहाय्यक कलाकारांमध्ये खुशबू सुंदर, सिमरत कौर, राजपाल यादव, अश्विनी काळसेकर, परितोष त्रिपाठी, मनीष वाधवा आणि राजेश शर्मा यांचा समावेश आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केले असून निर्मिती सुमन शर्मा यांनी केली आहे.

Story img Loader