सनी देओल आणि अमीषा पटेल यांचा ‘गदर 2’ चित्रपट ११ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच खूप चर्चेत आहे. सकीना आणि तारा सिंहच्या लव्ह स्टोरीमध्ये आता ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांची एंट्री होणार असल्याचं समोर आलं आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी याबाबत ट्वीट करून ‘गदर २’च्या चाहत्यांना ही खुशखबर दिली आहे.

हेही वाचा – “मी अजय देवगणविरोधात खटला दाखल केला तर…”; काजोलनं सांगितलं काय होईल

Nikki Giovanni
व्यक्तिवेध : निक्की जियोव्हानी
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Tharala Tar Mag Monika Dabade New Car
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी! नवऱ्यासह शेअर केले फोटो, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
Savlyachi Janu Savli
Video: “आई मला वाचव…”, सारंगचा जीव संकटात? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत पुढे काय होणार? वाचा…
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो

‘गदर 2’ या चित्रपटात नाना पाटेकर कोणत्याही भूमिकेत नसून त्यांनी या चित्रपटाला आवाज दिला आहे. नाना पाटेकरांच्या दमदार आवाजात या चित्रपटाची सुरुवात होणार आहे. याबाबच तरण आदर्श यांनी ट्वीट केलं आहे. ज्यामध्ये नाना पाटेकर डबिंग करताना दिसत आहे. या ट्वीटमध्ये तरण यांनी लिहिलं आहे की, “नाना पाटेकर यांनी ‘गदर 2’ या चित्रपटासाठी आवाज दिला आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला नाना पाटेकरांच्या आवाजात ‘गदर 2’बद्दल माहिती देण्यात येणार आहे.”

हेही वाचा- ‘खतरों के खिलाडी १३’मध्ये स्टंट करताना ‘हा’ मराठमोळा स्पर्धेक जखमी; हाताच्या बोटाला पडले टाके

यापूर्वी २००१ साली प्रदर्शित झालेल्या ‘गदर’ चित्रपटाला अभिनेते ओम पुरी यांनी आवाज दिला होता. पण ओम पुरी आता हयात नसल्यामुळे त्यांच्याऐवजी नाना पाटेकरांच्या दमदार आवाजात ‘गदर २’ चित्रपटाची सुरुवात होणार आहे.

हेही वाचा – “कॉलेजला जाताना एका मुलाने शिट्टी मारली अन्…”, मराठी अभिनेत्रीने सांगितला किस्सा; म्हणाली, “मी बॅगमधून…”

२२ वर्षानंतर ‘गद्दर २’ या चित्रपटातून सनी देओल आणि अमीषा पटेल ही जोडी पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर आणि पहिलं गाणं प्रदर्शित झालं होतं. ज्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. आता या चित्रपटाचा ट्रेलर कधी प्रदर्शित होणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

Story img Loader