Vanvaas Box Office Collection Day 4 : नाना पाटेकर, उत्कर्ष शर्मा व सिमरत कौर हे कलाकार असलेला ‘वनवास’ चित्रपट शुक्रवारी (२० डिसेंबर २०२४ रोजी) प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र, हा चित्रपट ‘पुष्पा २’ व ‘मुफासा’ यांच्या क्रेझमध्ये प्रेक्षकांना आकर्षित करण्यात अयशस्वी ठरला आहे. त्याचं कारण म्हणजे ‘वनवास’ची चार दिवसांची कमाई खूपच निराशाजनक आहे.

५ डिसेंबर रोजी ‘पुष्पा २’ प्रदर्शित झाला. मागील १९ दिवसांपासून हा चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवत आहे. हा चित्रपट जबरदस्त कमाई करत असतानाच ‘वनवास’ हॉलीवूड चित्रपट ‘मुफासा’ बरोबर रिलीज झाला. ‘मुफासा’देखील चांगले कलेक्शन करत आहे. या दोन मोठ्या चित्रपटांबरोबर प्रदर्शित झालेल्या ‘वनवास’ला फारसे प्रेक्षक मिळालेले नाहीत. कारण ‘पुष्पा 2’ व ‘मुफासा’च्या तुलनेत ‘वनवास’ची कमाई खूपच कमी आहे. या मोठ्या चित्रपटांबरोबर प्रदर्शित झाल्याचा फटका ‘वनवास’ला बसला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता चार दिवस झाले आहे. चार दिवसांत ‘वनवास’ने किती कमाई केली, ते जाणून घेऊया.

हेही वाचा – Video : “खंत वाटली…”, मधुराणी प्रभुलकरने कुलाबा किल्ल्याला भेट दिल्यानंतर व्यक्त केल्या भावना; म्हणाली, “कुणी गांभीर्याने…”

दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी २०२३ साली ‘गदर 2’ सारखा ब्लॉकबस्टर चित्रपट दिला होता. आता त्यांनी ‘वनवास’ आणला पण या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. या चित्रपटाला प्रदर्शित झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांचा फार चांगला प्रतिसाद मिळाला नाही. वीकेंडलाही चित्रपटाच्या कमाईत फारशी वाढ झालेली नाही. ‘वनवास’ची बॉक्स ऑफिसवर कामगिरी इतकी खराब आहे की, रिलीज होऊन चार दिवस उलटूनही तो पाच कोटींचा गल्ला जमवू शकलेला नाही.

हेही वाचा – ४ वर्षांनी हाथीराम चौधरी पुन्हा येतोय प्रेक्षकांच्या भेटीला; ‘पाताल लोक २’ कधी, कुठे पाहता येणार? जाणून घ्या

वनवासची चार दिवसांची कमाई

‘वनवास’ने पहिल्या दिवशी ६० लाख रुपये कमावले होते. दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी चित्रपटाची कमाई ९५ लाख रुपये होती. तिसऱ्या दिवशी ‘वनवास’ने १.४ कोटींची कमाई केली. आता चित्रपटाच्या चौथ्या दिवशीच्या कमाईचे आकडे आले आहेत. सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘वनवास’ ने रिलीजच्या चौथ्या दिवशी म्हणजेच पहिल्या सोमवारी ४५ लाखांची कमाई केली आहे. ‘वनवास’चे चार दिवसांचे एकूण कलेक्शन आता ३.४० कोटी झाले आहे.

हेही वाचा…‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर Pushpa 2 होणार प्रदर्शित, तब्बल ‘इतक्या’ कोटींमध्ये झाला करार

या चित्रपटाला समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाची कथा वडील आणि मुलाच्या नात्यावर आधारित आहे. कुटुंबासमवेत पाहण्यासारखा हा चित्रपट आहे. ‘वनवास’ चित्रपटाच्या निर्मितीसाठी जवळपास ३० कोटी रुपयांचा खर्च निर्मात्यांनी केला आहे. ‘वनवास’मध्ये नाना पाटेकर, उत्कर्ष शर्मा, सिमरन कौर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सहाय्यक कलाकारांमध्ये खुशबू सुंदर, सिमरत कौर, राजपाल यादव, अश्विनी काळसेकर, परितोष त्रिपाठी, मनीष वाधवा आणि राजेश शर्मा यांचा समावेश आहे.

Live Updates
Story img Loader